06 March 2021

News Flash

लिड इंडिया पब्लिशर असोसिएशनच्या अध्यक्षपदी जयपाल पाटील यांची नियुक्ती

संपूर्ण भारतात लहान वृत्तपत्र प्रकाशकांची अखिल भारतीय लिड इंडिया पब्लिशर असोसिएशनच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी साप्ताहिक ‘रायगडचा युवक’चे प्रकाशक जयपाल पाटील यांची नियुक्ती झाली

| December 25, 2012 04:02 am

 संपूर्ण भारतात लहान वृत्तपत्र प्रकाशकांची अखिल भारतीय लिड इंडिया पब्लिशर असोसिएशनच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी साप्ताहिक ‘रायगडचा युवक’चे प्रकाशक जयपाल पाटील यांची  नियुक्ती झाली आहे. याबाबत लिड इंडिया पब्लिशर्स असोसिएशन, नवी दिल्लीचे अध्यक्ष सुभाष सिंग यांनी पत्र दिले आहे. प्रकाशकांना येणाऱ्या अडचणी व केंद्र सरकारचे वेळोवेळी होणारे नवीन नियम, जाचक अटी याबाबत गेल्या दोन वर्षांपासून लिड इंडिया पब्लिशर असोसिएशनचे कार्य सुरू असून देशात प्रत्येक राज्यात संघटना उभी करण्याचे काम सुरू आहे जयपाल पाटील हे दहा वर्षांपासून ‘रायगडचा युवक’ प्रकाशित करीत असून महाराष्ट्र शासन मान्यता असलेल्या महाराष्ट्र साप्ताहिक संपादक परिषदेचे राज्य कार्यकारिणीमध्ये सदस्य म्हणून काम पाहत आहेत. यापूर्वी त्यांनी या संस्थेचे जिल्हा अध्यक्षपद भूषविले होते. लिड इंडिया संस्थेच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी नियुक्तीचे पत्र संस्थेचे उपाध्यक्ष रामनरेश यांनी जयपाल पाटील यांच्या हाती दिले. या नियुक्तीपत्राची प्रत राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई यांना दिलेली आहे.
प्रकाशकांच्या या संघटनेच्या छोटय़ा वृत्तपत्रांचे प्रकाशक यांनी एकत्र येऊन आपल्या अडचणी सोडविण्यासाठी साप्ताहिक ‘रायगडचा युवक’चे संपादक जयपाल पाटील, अदिती चेंढर, मु.पो.ता. अलिबाग, जिल्हा रायगड-४०२२०१ मो. क्र. ९२७०४४६७७७ यांच्याशी संपर्क साधण्यात यावा व संघटनेत सहभागी होऊन सभासद व्हावे, असे आवाहन केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2012 4:02 am

Web Title: jaypal patil has got elected for chief of lead india publisher assocation
Next Stories
1 सावंतवाडी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष यशवंत दाभोळकर यांचे हृदयविकाराने निधन
2 अभिनेते आनंद अभ्यंकर आणि अक्षय पेंडसे यांचे अपघाती निधन
3 संत्रा उत्पादकांच्या डोळ्यात पाणी
Just Now!
X