News Flash

सहकारमहर्षी जयवंतराव भोसले यांचे निधन

महाराष्ट्रातील बलाढय़ कृष्णा उद्योग समूहाचे आधारवड तथा कृष्णा अभिमत विद्यापीठाचे कुलपती, सहकारमहर्षी जयवंतराव कृष्णराव भोसले (८९) यांचे सोमवारी सायंकाळी निधन झाले.

| August 6, 2013 02:45 am

महाराष्ट्रातील बलाढय़ कृष्णा उद्योग समूहाचे आधारवड तथा कृष्णा अभिमत विद्यापीठाचे कुलपती, सहकारमहर्षी जयवंतराव कृष्णराव भोसले (८९) यांचे सोमवारी सायंकाळी निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी जयमाला, पुत्र पृथ्वीराज व डॉ. सुरेश, नातू डॉ. अतुल व विनायक, पुतणे डॉ. इंद्रजित व मदनराव मोहिते यासह एक कन्या, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. मंगळवारी कराड येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यविधी होणार आहे.
जयवंतरावांचा जन्म २२ डिसेंबर १९२४ रोजी झाला. संस्थापक सदस्य असलेल्या कृष्णा कारखान्याचे ते मे १९६० पासून सलग तीन दशके अध्यक्ष होते. १९८० ते ८२ दरम्यान ते विधानपरिषदेचे सदस्य होते. थोर विचारवंत यशवंतराव मोहिते यांचे बंधू असलेल्या जयवंतराव भोसले यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी दु:ख व्यक्त केले आहे.
आमदार विलासराव पाटील-उंडाळकर, कृष्णा साखर कारखान्याचे अध्यक्ष अविनाश मोहिते, माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते आदी मान्यवरांनी तत्काळ कृष्णा रुग्णालयात येऊन जयवंतराव भोसले यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 6, 2013 2:45 am

Web Title: jaywantrao bhosale passes away
Next Stories
1 निवडणुका आल्यावर मेटेंना मराठा आरक्षणाची आठवण
2 धुळ्यात दोन काश्मिरी युवक पोलिसांच्या ताब्यात
3 मनसे कार्यकर्त्यांवर पोलिसांचा लाठीमार; ७ जणांना अटक
Just Now!
X