News Flash

साताऱ्यात भीषण अपघात; जीप दरीत कोसळून चार ठार

साताऱ्यातील घाटावर जीप दरीत कोसळली असून अपघाताचे वृत्त समजताच आपातकालीन यंत्रणा घटनास्थळी पोहोचल्या आहेत.

सांगलीतील काही भाविक माण तालुक्यातील डोंगरावरील श्री भोजलिंग देवस्थानच्या दर्शनासाठी जात होते.

साताऱ्यात भीषण कार अपघात झाला असून नियंत्रण सुटलेली जीप २५० फूट खोल दरीत कोसळल्याची घटना शनिवारी घडली. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून ९ जण या अपघातात जखमी झाले आहेत. भोजलिंगाच्या दर्शनासाठी जात असताना हा अपघात घडला.

सांगलीतील काही भाविक माण तालुक्यातील डोंगरावरील श्री भोजलिंग देवस्थानच्या दर्शनासाठी जात होते. म्हसवड येथील जांभुळणीकडील डोंगर उतारावर चालकाचे जीपवरील नियंत्रण सुटले आणि जीप दरीत कोसळली. जीप दरीत कोसळल्याने चार भाविकांचा मृत्यू झाला. जीपमध्ये एकूण १३ जण होते. अपघातात जखमी झालेल्या उर्वरित नऊ जणांना उपचारासाठी म्हसवड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दर्शनासाठी जात असलेली जीप आटपाडी येथील विटलापूर येथील असल्याचे समजते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 22, 2018 1:04 pm

Web Title: jeep on way to bhojling temple falls in gorge in satara devotees dies injured
Next Stories
1 मोदींना अमित ठाकरेंच्या लग्नाची पत्रिका देणार का?, राज ठाकरे म्हणतात…
2 मोदींवरील रागामुळेच तीन राज्यात भाजपाचा पराभव: राज ठाकरे
3 ही तर हनुमानाची टिंगलटवाळीच; शिवसेनेने भाजपाला सुनावले
Just Now!
X