News Flash

कलबुर्गीत जीप-टँकरच्या अपघातात सोलापूरचे पाच ठार

वैराग येथील एक कुटुंब कर्नाटकात लग्न समारंभासाठी जात होते.

कलबुर्गी (कर्नाटक) येथे झालेल्या क्रूझर व टँकरच्या भीषण अपघातात वैराग (ता़. बार्शी, जि. सोलापूर) येथील पाच जण जागीच ठार तर अन्य सहा जण जखमी झाले.

कलबुर्गी (कर्नाटक) येथे झालेल्या क्रूझर व टँकरच्या भीषण अपघातात वैराग (ता. बार्शी, जि. सोलापूर) येथील पाच जण जागीच ठार तर अन्य सहा जण जखमी झाले. ही घटना आज (मंगळवार) सकाळच्या सुमारास घडली. जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

वैराग येथील एक कुटुंब जीपमधून कर्नाटकात लग्न समारंभासाठी जात होते. कर्नाटक हद्दीतील कलबुर्गी-हुमनाबाद महामार्गावर औराद गावाजवळ आल्यानंतर कर्नाटकातून येणाऱ्या टँकर (केए ३२ सी ४५४६) व जीपची समोरासमोर धडक बसली. यात जीपमधील पाच जण जागीच ठार तर सहा जण गंभीर जखमी झाले. जखमींवर शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती कळताच कलबुर्गी पोलिसांनी घटनास्थळी त्वरीत धाव घेतली आणि जखमींना वेळेवर मदत केली. या घटनेनंतर वैराग गावावर शोककळा पसरली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 21, 2017 4:23 pm

Web Title: jeep tanker accident in kalburgi 5 solapur citizen dies
Next Stories
1 कैसे पढेगा इंडिया! औरंगाबादमध्ये उघड्यावर भरते शाळा
2 भाजपचे मंत्री, खासदार, आमदार यांची दाढी-कटिंग करायची नाही: नाभिक संघटना
3 कोपर्डी प्रकरण हा दुर्मिळातील दुर्मीळ गुन्हा नाही, बचाव पक्षाचा युक्तीवाद
Just Now!
X