07 April 2020

News Flash

‘जिजाबाई शिवाजी महाराजांच्या पत्नी’ संस्कृत सारिका पुस्तकात तोडले तारे

शिवरायांची आणि जिजाबाईंची जाणीवपूर्वक बदनामी करण्यात आल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे

११ वी विषयाच्या संस्कृत सारिका या नावाच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांची वंशावळ दाखवण्यात आली आहे. महाराजस्यया वंशावळीत शिवाजी महाराजांच्या आई जिजाबाई यांचा उल्लेख ‘पत्नी’ म्हणून करण्यात आला आहे. हे संस्कृत विषयाचे पुस्तक अतिशय वादग्रस्त असून महाराजांची बदनामी करण्याचा हा कट जाणीवपूर्वक केला जातो आहे का? असा प्रश्न संभाजी ब्रिगेडने उपस्थित केला आहे.

संस्कृत सारिका हे लातूरच्या निकिता पब्लिकेशनचे पुस्तक राजेंद्र शास्त्री (गायकवाड) यांनी लिहिले आहे. त्यांनी शिवाजी महाराजांच्या मातेचा उल्लेख पत्नी म्हणून कसा केला? इतिहासाचा विपर्यास करण्यासाठी हा जाणीवपूर्वक करण्यात आलेला खोडसाळपणा आहे असेही संभाजी ब्रिगेडने म्हटले आहे.

संस्कृत सारिका हे वादग्रस्त पुस्तक त्वरित रद्द करावे. संबंधित पुस्तकात राष्ट्रमाता जिजाऊंची बदनामी करणाऱ्या सगळ्यांवर सामाजिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी लेखक, वितरक, प्रकाशकव अभियानाचे प्रमुख यांच्यावर महापुरुषांची बदनामी प्रकरणी राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी संभाजी ब्रिगेड आणि जिजाऊ ब्रिगेडने केली आहे.

इ. ११ वी. च्या आभ्यासक्रमात राष्ट्रमाता जिजाऊ यांना छत्रपती शिवाजी महाराजांची ‘पत्नी’ दाखवले आहे. असा भयंकर बदनामी करणारा मजकूर माध्यमिक महाविद्यालयांच्या मुलांना आभ्यासासाठी पुस्तकात छापला व शिकवला जातो हे भयानक खोटेपणा आहे. हा राज्य सरकारचा भोंगळ कारभार आहे… हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. राज्याचा शिक्षण विभाग ‘विनोदाच्या तावडीत’ सापडला आहे असाही आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 14, 2018 1:26 pm

Web Title: jijamatas name as wife of shivaji maharaj in 11 th sanskrit text book
Next Stories
1 बोफोर्सप्रमाणेच राफेल प्रकरणातही आता जनताच निर्णय घेणार: संजय राऊत
2 राज ठाकरे म्हणजे विझलेला दिवा – वारिस पठाण
3 मोहन भागवत तुम्ही खेळ सुरु केला, अंत मी करणार: प्रकाश आंबेडकर
Just Now!
X