News Flash

मल्ल्याचा मल्हारराव होळकर झाला, जितेंद्र आव्हाड यांचं वादग्रस्त ट्विट; धनगर समाजात संताप

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत

जितेंद्र आव्हाड

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. मल्ल्याचा मल्हारराव होळकर होतो असं म्हटल्याने जितेंद्र आव्हाड अडचणीत आले असून होळकरप्रेमी व धनगर समाजात संताप उसळला आहे. ‘या देशात वाल्याचा वाल्मिकी होतो आणि मल्ल्याचा मल्हारराव होळकर होतो’ असे ट्विट जितेंद्र आव्हाडांनी केले होते. मात्र ट्विटविरोधात संताप व्यक्त होऊ लागल्यानंतर 15 मिनिटांतच त्यांना ट्विट डिलीट करावं लागलं.

जितेंद्र आव्हाड यांचे ट्विट काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. जितेंद्र आव्हाड यांच्या ट्विटचे स्क्रिनशॉट व्हॉट्सअॅप व फेसबुकवर व्हायरल झाले होते. यानंतर होळकर प्रेमींनी आव्हाड यांच्या विरोधात निषेध व्यक्त केला.

जितेंद्र आव्हाड यांचं स्पष्टीकरण –
मल्हारराव होळकर यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मात करून मोठं राज्य स्थापन केले. त्यांना कोणताही वारसा नव्हता. सामान्य माणूस किती मोठं कर्तृत्व दाखवू शकतो असे म्हणायचे होते पण त्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आला. या ट्विटमुळे वाद निर्माण होऊ नये यासाठी ते १५ मिनिटामध्ये डिलिट करण्यात आले.

बहुजन समाजातील अशा मोठ्या व्यक्तीबद्दल वाईट शब्द उच्चारणे माझ्या रक्तात नाही. तरीही बहुजन समाजाच्या भावना दुखावल्या असतील तर मी क्षमा मागतो, असे देखील आव्हाडांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 19, 2018 12:35 pm

Web Title: jitendra awhad controversial tweet on malharrao holkar
Next Stories
1 दुष्काळात पूर्ण मदत करु, मोदींचा महाराष्ट्राला शब्द
2 PHOTO: साताऱ्यातील तरुणाईमध्ये नवीन राजांचा ‘उदय’
3 Maharashtra ‘honour killing’: प्रियकराच्या संशयामुळे वडील सापडले जाळ्यात
Just Now!
X