News Flash

जितेंद्र आव्हाडांनी केलं ‘आराध्या’चं कौतुक; म्हणाले, … हीच विठ्ठल चरणी प्रार्थना

आव्हाड यांनी केलं ट्विट

चीनमधून आलेल्या करोनाच्या संकटानं महाराष्ट्र आणि देशासमोर नवं आरिष्ट निर्माण केलं आहे. करोनाला तोंड देण्यासाठी राज्य सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. या अभूतपूर्व संकटाच्या काळात अनेक संस्था, संघटना, उद्योजक सरकारच्या मदतीसाठी धावून आल्या आहेत. राज्यातील नागरिकही आपआपल्या परीनं खारीचा वाटा उचलत मुख्यमंत्री सहायता फंडामध्ये निधी जमा करत आहेत. मदत कार्यात एक चिमुरडीही सहभागी झाली आहे. मदतीनं भारावून गेलेल्या गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना आराध्याचं कौतुक करायचा मोह आवरला नाही.

करोनाचा उपद्रव वाढल्यानंतर राज्य सरकारनं आर्थिक काटकसरीचं धोरणं स्वीकारलं. शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगार सध्या कमी देऊन परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर उर्वरित पगार देण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर केंद्र सरकारकडेही मदतीची मागणी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या मदत कार्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीत मदत करण्याचं आवाहन केलं. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असून, सोलापूरच्या ७ वर्षांच्या आराध्यानं दहा हजार रुपयांची मदत केली आहे. आराध्यानं आपला वाढदिवस साजरा न करण्याचं ठरवतं ही १० हजार रुपयांची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा केली.

सोलापूरचे पालकमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी याबद्दल आराध्याचं कौतुक केलं आहे. “सोलापूरची ७ वर्षांची आराध्या जिने वाढदिवस साजरा न करता करोनाशी सामना करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीला तिने जमा केलेले १०,००० रुपये दिले. आराध्या तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुला निरोगी आनंदी दीर्घायुष्य लाभो हीच विठ्ठलाचरणी प्रार्थना,” असं शब्द आव्हाड यांनी आराध्याचं कौतुक केलं आहे.

देशात करोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून तो आता ३३७४ वर पोहोचला आहे. तर यामुळे ७७ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. एकूण ३३७४ रुग्णांपैकी ३०३० रुग्ण हे पॉझिटिव्ह आहेत. तर २६७ रुग्णांचे चाचण्या निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ७७ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, भारतात गेल्या १२ तासांमध्ये ३०२ नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2020 1:18 pm

Web Title: jitendra awhad praise aaradhya for donating money in relife fund bmh 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 Coronavirus: समुद्रात अडकलेल्या खलाशांची सुटका; नागोळ-उंबरगाव खाडीत उतरवलं
2 Coronavirus: भाजपा आमदाराचं वाढदिवशी धान्यवाटप; संचारबंदी धाब्यावर बसवत तुफान गर्दी
3 Coronavirus: पुण्यात करोनामुळं चोवीस तासात तिघांचा बळी; शहरात एकूण पाच जणांचा मृत्यू
Just Now!
X