रायगड जिल्ह्य़ातील पनवेलजवळ आपटा येथे बसमध्ये बॉंम्ब सापडल्यानंतर तपास यंत्रणा कामाला लागल्या आहेत. एटीएसबरोबरच रायगड पोलिसांची आठ पथके कार्यरत आहेत. दुसरीकडे बसमध्ये सापडलेल्या बॉम्बचा प्रवास हा अलिबाग ते कर्जत आणि तेथून आपटा या मार्गावरून झाला असल्याची बाब समोर आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अलिबाग आगारातून बुधवारी सायंकाळी पावणेसहाच्या दरम्यान एसटीची (एमएच१४/बीटी २७२४) या क्रमांकाची बस प्रवाशांना घेऊन कर्जतकडे निघाली होती. या एसटी बसमध्ये चालक गजानन जारंडे व वाहक पुजाराम मेंडके हे डय़ुटीवर होते. प्रवाशांना घेऊन जाणारी ही एसटी बस वाहतूक कोंडीमुळे रात्री पावणेनऊ वाजता कर्जत येथे पोहोचली. तेथे वाहक मेंडके हे बस खाली उतरून आपला डबा आणण्यासाठी गेले. त्यामुळे चालक गजानन जारंडे यांनी उतरताना वाहक मेंडके यांच्या सामानासह ती पिशवी चालकाची समजून घेतली.

कर्जत येथून आपटा येथे जाणाऱ्या दुसऱ्या एसटी बसमध्ये (बस क्रमांक एमएच१४/बीटी १५९१) चालकाने स्वत:चे व वाहकाचे सामान ठेवले. त्यानंतर नऊ वाजता ही कर्जतवरून आपटय़ाकडे जाण्यासाठी निघाली. आपटा येथे आल्यानंतर

चालक जारंडे याने वाहक मेंडके यांना तुझी पिशवी पण घे. असे सांगितले. तेव्हा मेंडके यांनी माझ्याकडे कोणतीही पिशवी नाही, असे सांगितले. त्यामुळे चालक जारंडे यांनी उचललेली पिशवी वाहक मेंडके यांनी तपासली असता त्यात त्यांना बॉम्ब सदृश्य वस्तू असल्याचे निर्दशनात आले.

पोलीस अधिकाऱ्यांबरोबरच एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणेकडून आता अलिबाग ते कर्जत असा शोध सुरू करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Journey of bombs from two bus
First published on: 24-02-2019 at 01:10 IST