गंजबाजारातील व्यापारी जितेंद्र भाटिया यांच्या खून प्रकरणात अटकेत असलेली त्याची पत्नी हेमा ऊर्फ दिव्या भाटिया व तिचा प्रियकर प्रदीप जनार्दन कोकाटे या दोघांची आज न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. या गुन्हय़ातील तिसरा आरोपी विक्रम ऊर्फ गोटय़ा बेरड याची पूर्वीच न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
हेमा भाटिया व प्रदीप कोकाटे या दोघांच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपत होती. कोतवाली पोलिसांनी दोघांना पुन्हा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे हजर केले. हेमा भाटिया हिने प्रदीपला गावठी पिस्तूल खरेदी करण्यासाठी १० हजार रुपये दिले होते. ही रक्कम तिने कोठून आणली याचा शोध घेण्यासाठी पोलीस कोठडीची मुदत वाढवावी अशी विनंती तपासी अधिकारी, पोलीस निरीक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील यांनी न्यायालयाला केली. त्यास आरोपींचे वकील संजय दुशिंग व वकील महेश तवले यांनी विरोध केला. न्यायालयाने हेमा व प्रदीप या दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगीचा आदेश दिला.
हेमा व प्रदीप यांच्या अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने दोघांनी कट करून, पंधरा दिवसांपूर्वी जितेंद्र हा गंजबाजारमधील मोहन ट्रंक डेपो या दुकानात बसलेला असतानाच, प्रदीप याने त्यांची गोळय़ा घालून हत्या केल्याचा आरोप आहे. विक्रम बेरड याने प्रदीपला गावठी पिस्तूल विकल्याचे निष्पन्न झाले आहे.

Ram Navami, High Court, State Govt,
रामनवमीला खबरदारी घ्या! उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश
supreme court on private hospitals bed
राखीव खाटांच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाकडून खासगी रुग्णालयांची कानउघडणी; म्हणाले, “ही रुग्णालये सरकारी अनुदान घेतात पण…”
Abhishek Ghosalkar murder case
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणाचा तपास सीबीआय किंवा एसआयटीकडे द्या, तेजस्वी घोसाळकरांची उच्च न्यायालयात मागणी
Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा