28 November 2020

News Flash

कबड्डी पुरस्कारांचे वितरण

संघटना तसेच पत्रकार यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनतर्फे नागोठणे येथे आयोजित करण्यात आलेल्या १६ व्या कबड्डीदिन समारंभात कबड्डीक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडू, पंच, संघटक, संघटना तसेच पत्रकार यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनच्या विद्यमाने रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन व रिलायन्स इंडस्ट्रीज नागोठणे यांच्या संयुक्त यजमानपदाखाली बालगंधर्व नाटय़गृह, रिलायन्स टाऊनशिप, नागोठणे येथे कबड्डीदिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे, माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष किशोर पाटील, रिलायन्स इंडस्ट्रीज नागोठणेचे उपाध्यक्ष विनय किर्लोस्कर, प्रशासकीय प्रमुख राजीव शर्मा, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष दत्ता पाथ्रीकर, रायगड जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम सभापती चित्रा पाटील, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह अ‍ॅड. आस्वाद पाटील, आंबेपूर ग्रामपंचायतीच्या सरपंच भावना पाटील, रमेश धनावडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. कबड्डी खेळात योगदान देणाऱ्या ३२ जणांचा यावेळी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2016 1:44 am

Web Title: kabaddi awards distribution in alibag
Next Stories
1 गावठी दारूविरोधात धडक कारवाई 
2 दर्डाच्या जामिनाविरुध्द उच्च न्यायालयात अपील दाखल करा
3 अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचे प्रकरण : विधिमंडळात सरकारला जाब विचारण्याचा इशारा
Just Now!
X