राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टलिायझर्स (आरसीएफ) थळ प्रकल्प यांच्यातर्फे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून रविवारी (१ मे) रोजी कामगार स्मृती चषक जिल्हास्तरीय आदिवासी कबड्डी स्पध्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा आर.सी.एफ. क्रीडा संकुल, आंग्रेनगर कुरुळ, ता. अलिबाग येथे खेळली जाणार आहे. स्पध्रेच्या दिवशी सकाळी ९ पर्यंत येणाऱ्या रायगड जिल्ह्य़ातील ६४ आदिवासी पुरुष संघांना या स्पध्रेत प्रवेश दिला जाणार आहे.
कबड्डी खेळासाठी प्रसिद्ध असलेल्या रायगड जिल्ह्य़ात आरसीएफ थळतर्फे सामाजिक बांधीलकी व आदिवासींमध्ये चांगले खेळाडू तयार व्हावेत म्हणून गेली सलग आठ वष्रे आरसीएफ ही स्पर्धा आयोजित करत आहे. आदिवासी खेळाडूंना यामुळे चांगली संधी मिळते. त्यामुळे या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या स्पध्रेच्या आयोजनात आर.सी.एफ. थळ युनिट बरोबरच अलिबाग प्रेस असोसिएशन प्रसार माध्यम सहयोगी म्हणून प्रसिद्धी सहभाग देणार आहेत.
सांघिक पारितोषिकांबरोबरच स्पध्रेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट पकड, उत्कृष्ट चढाईसाठी अशी वैयक्तिक पारितोषिके दिली जाणार आहेत. स्पध्रेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या संघांनी अधिक माहितीसाठी वैभव जाधव- (०२१४१)२३८२०७, ८८०६६५६६००, दिलीप धुमाळ- ९४२०६४५३८० किंवा धनंजय खामकर- ९४२३३७७८७६ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आरसीएफ थळ प्रकल्पाचे कार्पोरेट कम्युनिकेशन व्यवस्थापक धनंजय खामकर यांनी केले आहे.