News Flash

अडीच लाखांची लाच घेताना कागलचा तहसीलदार अटकेत

तहसीलदारासोबतच दोन तलाठीही अटकेत

प्रातिनिधिक छायाचित्र

कोल्हापुरात सहा वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या जमिनीच्या सातबारावर पत्रकी नाव नोंदणीसाठी अडीच लाखांची लाच घेताना कागलचा तहसीलदार किशोर घाटगेला अटक करण्यात आली. त्याच्यासह शमशहाद दस्तगीर आणि मनोज भोजे या दोन तलाठ्यांनाही अटक करण्यात आली.

गेल्या महिन्यात लाचेची रक्कम स्वीकारताना पन्हाळा येथे एका शासकीय कार्यालयातील सर्व कर्मचारी पकडले गेले होते , आता महसूल मंत्र्यांच्या कोल्हापुरात तहसीलदारसह  दोन तलाठ्यांना  अटक झाल्याने  महसूल मधील भ्रष्टाचाराच्या साखळीचीच  चर्चा रंगली आहे .

या प्रकरणातील तक्रारदार यांचे कसबा  सांगाव येथे राहत असून त्यांच्या वडिलांनी सुळकुड येथे शेत खरेदी केले आहे .  ७६ आर इतक्या आकाराच्या शेताचे सात बारा पत्रकी  नाव लागण्यासाठी ते प्रयत्न करत होते . त्यांनी  सुळकुडांच्या तलाठी शमशहाद दस्तरीग मुल्ला यांची भेट घेतली . मुल्ला यांनी स्वतःला एक लाख आणि तहसीलदार घाटगे यांची बदली होणार असल्याने त्यांच्यासाठी दोन लाख रुपयांची लाच मागितली . तक्रारदार यांनी लाच लुचपत विभागाशी संपर्क साधला . आज  तक्रारदार संजय जगताप यांच्याकडून मुल्ला यांनी स्वतःसाठी तर घाटगे यांच्यासाठी तलाठी मनोज   भोजे हे लाचेची रक्कम घेताना रंगेहाथ पकडले गेले . तिघांना अटक करण्यात आली आहे .

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2018 9:03 pm

Web Title: kagal tahsildar arrested while taking bribe of 2 5 lakhs
Next Stories
1 नोकरीवरून काढल्याच्या रागातून सुरक्षा रक्षकाचा जीपवर गोळीबार
2 फक्त चार सफरचंदाच्या वादातून तरुणाचा जीव गेला
3 पुण्यातल्या ‘भारी’ शाळेमध्ये प्रवेशासाठी केला मोदींच्या नावाचा वापर
Just Now!
X