News Flash

खरिवली गाव प्रदुषणाचा विळख्यात

तालुक्यातील खरिवली गावात असलेल्या दगडखाणी आणि क्रशर मशीनमुळे मोठय़ा प्रमाणावर धुळीचे साम्राज्य पसरले  असून त्यामुळे होणाऱ्या प्रदुषणाने नागरिक हैराण झाले आहेत. 

ध्वनी, वायू प्रदूषणाबरोबरच जमिनीला बसलेल्या हादऱ्यामुळे अनेक घरांना तडे गेले असल्याने येथील ग्रामस्थ संताप व्यक्त करत आहेत.

दगडखाणीमुळे परिसरात धुळीचे साम्राज्य

लोकसत्ता, वार्ताहर

वाडा :  तालुक्यातील खरिवली गावात असलेल्या दगडखाणी आणि क्रशर मशीनमुळे मोठय़ा प्रमाणावर धुळीचे साम्राज्य पसरले  असून त्यामुळे होणाऱ्या प्रदुषणाने नागरिक हैराण झाले आहेत.   ध्वनी, वायू प्रदूषणाबरोबरच जमिनीला बसलेल्या हादऱ्यामुळे अनेक घरांना तडे गेले असल्याने येथील ग्रामस्थ संताप व्यक्त करत आहेत.

खरीवली गावात मोठय़ा प्रमाणावर क्रशर कंपन्या आणि दगड खाणी आहेत. येथे प्रचंड प्रमाणावर गेली अनेक वर्ष सुरुंग स्फोटाद्वारे दगड उत्खनन होत आहे. एकाच गावात एवढय़ा मोठय़ाप्रमाणात दगड उत्खनन होत असल्याने त्याचा पर्यावरणावर विपरीत परिणाम होत आहे. खरीवली गावापासून काही अंतरावर ऐतिहासिक वारसा असलेला कोहोज किल्ला आहे. येथील  जंगल परिसरातील वन्यजीव प्राण्यांना या सुरुंग स्फोटांमुळे धोका संभावण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ग्रामस्थांनी श्री शिवसाई महिमा स्टोन  क्रशर कंपनीविरोधात शनिवारी  झालेल्या ग्रामसभेत  ही प्रदुषणकारी क्रशर कंपनी बंद करण्याचा ठराव घेतला आहे.   ठरावाद्वारे संबंधित यंत्रणांकडे तक्रार करणार असून   कंपनीवर कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

श्री शिवसाई महिमा क्रशर कंपनीच्या प्रदुषणामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने याची गंभीरपणे दखल घेऊन कारवाई करावी.

-सदानंद अधिकारी, ग्रामस्थ, खरिवली, ता. वाडा.

श्री शिवसाई महिमा क्रशर कंपनीला काही नियमांच्या अधिन राहुन परवानगी दिली होती. मात्र नियमांचे उल्लंघन केल्याने त्यांची नाहरकत परवानगी  रद्द करण्यासंदर्भात  ठराव घेण्यात आला आहे.

-यतीन शिंदे, ग्रामसेवक, ग्राम पंचायत खरीवली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 12, 2021 2:55 am

Web Title: kahrivali village under pollution grip dd 70
Next Stories
1 वणव्याची धग कोहोज किल्लय़ाला
2 घरबांधणी साहित्य खरेदीसाठी ‘घरकुल मार्ट’
3 करोना कराल : पालिका पास की नापास? पालघर जिल्हा – अपुऱ्या मनुष्यबळामुळे अडचणी
Just Now!
X