News Flash

धक्कादायक! घरगुती वादातून शिवसेना पदाधिकारी सूनेच्या तोंडावर थुंकला; भाजपाचा कट असल्याचा दावा

शिवसेना पदाधिकाऱ्याचा घरगुती वाद पोलीस ठाण्यात, सासऱ्यावर कारवाईची सुनेची मागणी

घरगूती वादातून सासरा सूनेच्या तोंडावर थुंकल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ एका शिवसेना पदाधिकाऱ्याचा असून सुनेने या प्रकरणी पोलिसांत तक्रार दिली आहे. मात्र हे सर्व भाजपा नेत्यांचे कटकारस्थान असून सर्व आरोप खोटे असल्याचा दावा शिवसेना पदाधिकारी एकनाथ पाटील यांनी केला आहे. कल्याणमध्ये ही घटना घडली आहे.

सूनेची तक्रार
शनिवारी संध्याकाळी भोपर गावातील हर्षला पाटील यांनी सोशल मीडियावर शिवसेना नेता व सासरे एकनाथ पाटील तोंडावर थुंकल्याचा व्हिडीओ शेअर करक पोलिसांकडे कारवाईसाठी विनंती केली होती. सासरे एकनाथ पाटील गेल्या काही वर्षांपासून मानसिक त्रास देत असल्याचा तसंच मारहाणीचा आरोप त्यांनी केला.

एकनाथ पाटील यांचा भाजपावर आरोप
दरम्यान कल्याण तालुक्याचे विधानसभा संघटक असणारे एकनाथ पाटील यांचं म्हणणं आहे की, “मी ५५ वर्षांपासून राजकारणात आहे. माझ्यावर कोणीही असा आरोप केला नाही. हा व्हिडीओ आहे दोन वर्षांपूर्वीचा आहे. पोलिसांनी आमच्यातील वाट मिटवला होता. भाजपाच्या संदीप माळी यांनी राजकीय फायद्यासाठी सूनेला हाताशी धरुन माझी बदनामी सुरु केली आहे. हे सर्व आरोप खोटे आहेत’.

दरम्यान भाजपाचे संदीप माळी यांनी पाटील यांच्या घरगुती वादाशी माझा काही संबंध नाही, चुकीचे आरोप केल्यास त्यांना न्यायालयात खेचणार असा इशारा दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 30, 2021 7:35 pm

Web Title: kalyan shivsena activist split on daughter in law face video viral on social media sgy 87
Next Stories
1 ठाणे जिल्ह्यातील शहरांचा पाणीपुरवठा सुरळीत
2 बनावट ओळखपत्राद्वारे अभिनेत्री मीरा चोप्राचे लसीकरण 
3 अर्ध्या ठाणे जिल्ह्यावर पाणीसंकट
Just Now!
X