पनवेलजवळच्या इरशाळगडावर ट्रेकिंगला गेलेल्या कल्याणमधील युवकाचा खोल दरीत पडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी सांयकाळच्या सुमारास घडली. क्षितिज सांगळे असे अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. क्षितिज हा कल्याणमध्ये राहत होता.
क्षितिज आपल्या चार मित्रांसह रविवारी दुपारी इरशाळगडावर ट्रेकिंगला गेला होता. सांयकाळच्या सुमारास गडाच्या एका टोकावरून जाताना त्याचा पाय घसरला आणि तो खोल दरीत कोसळला. क्षितिजच्या मित्रांनी मदतीसाठी पोलिसांना फोन केला. खालापूर पोलीस, गिर्यारोहकांच्या पथकाने क्षितिजचा मृतदेह दरीतून बाहेर काढला. क्षितिजबरोबर अतिश कासारे, सुधाकर इप्पर, निलेश कासारे हे मित्र ट्रेकिंगला गेले होते. पंचनाम्यानंतर क्षितिजचा मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 31, 2018 8:22 am