21 September 2020

News Flash

कंगना रणौतच्या आईची शिवसेनेवर टीका, ‘पळपुटे’ उल्लेख करत म्हणाल्या…

अमित शाह आणि मोदींचे मानले आभार

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतची आई आशा रणौत यांनी शिवसेनेवर टीका केली असून पळपुटे असा उल्लेख केला आहे. कंगना रणौतने मुंबईची तुलना पाकिस्तानव्याप्त काश्मीरसोबत तुलना केल्यानंतर वाद निर्माण झाला होता. कंगनाने आपल्याला मुंबईत येऊ नको अशा धमक्या दिल्या जात असल्याचं सांगताना ९ सप्टेंबरला रोखून दाखवण्याचं आव्हानच दिलं होतं. कंगना मुंबईत येणार त्याच दिवशी महापालिकेकडून जुहू येथील तिच्या कार्यालयावरील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली. त्यावरुन वाद अजून पेटला आहे.

आज तक वृत्तवाहिनीशी बोलताना कंगनाची आई आशा रणौत यांनी शिवसेनेवर टीका केली. त्यांनी शिवसेनेचा पळपुटे असा उल्लेख केला. पुढे त्या म्हणाल्या की, “संपूर्ण भारत आपल्या मुलीचं समर्थन करत आहे. मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांचे आभार मानते. माझ्या मुलीचं संरक्षण केल्याबद्दल भाजपाचे आभार”.

आशा रणौत यांनी यावेळी कंगना मुंबईतच राहणार असल्याची माहिती दिली आहे. “कंगना महाराष्ट्रातच राहणार आहे. १५ वर्षांपासून ती मुंबईत असून अर्ध आयुष्य तिने तिथंच घालवलं आहे. महाराष्ट्र हा सर्वांसाठी आहे,” असं त्यांनी म्हटलं आहे. याआधी त्यांनी आमचं कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेससोबत होतं. मात्र, मोदी सरकारने आमचे हृदय जिंकले आहे. यामुळे आता आम्ही पूर्णपणे भाजपाचे झालो आहोत असं म्हटलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 11, 2020 10:22 am

Web Title: kangana ranaut mother asha ranaut calls shivsena coward sgy 87
Next Stories
1 करोनाबाधितांची संख्या ४५ लाखांहून अधिक; एका दिवसात ९६,५५१ नवे रुग्ण
2 “नेव्हर अंडरएस्टिमेट हिम…”
3 उत्तर प्रदेश : राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत दाखल करण्यात आलेली अर्ध्याहून अधिक प्रकरणं गोहत्येसंदर्भातील
Just Now!
X