News Flash

‘कन्नड रक्षण वेदिके’चे कार्यकर्ते आक्रमक; येळ्ळूरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न

बेळगाव पोलिसांनी शनिवारी कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांचा येळ्ळूरमध्ये शिरण्याचा प्रयत्न हाणून पाडला.

| August 2, 2014 12:08 pm

बेळगाव पोलिसांनी शनिवारी कन्नड रक्षण वेदिके संघटनेच्या कार्यकर्त्यांचा येळ्ळूर गावात शिरण्याचा प्रयत्न हाणून पाडला. या पार्श्वभूमीवर सध्या बेळगाव पोलिसांकडून येळ्ळूर गावाकडे जाणाऱ्या सर्व मार्गांवर नाकेबंदी करण्यात आली आहे. यावेळी पोलिसांनी कन्नड रक्षण वेदिके संघटनेचे नेते नारायण गौडा यांना ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे बेळगावात तणाव निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत.
सर्वोच्च न्यायालयानेसुद्धा येळ्ळूरमध्ये अमानुष लाठीमाराची दखल घेत, राज्य सरकारच असे अत्याचार करणार असेल तर त्यापेक्षा दुसरी गंभीर बाब असू शकत नाही, अशा शब्दांत कर्नाटक सरकारवर ताशेरे ओढले होते.
येळ्ळूरमधील अमानुष मारहाण गंभीर- सर्वोच्च न्यायालय 

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2014 12:08 pm

Web Title: kannada rakshana vedike supporters aggressive on yellur issue
टॅग : Karnataka,Maharashtra
Next Stories
1 संततधार पावसामुळे नद्यांच्या पातळीत वाढ
2 धनगर समाजाचा इचलकरंजीत आरक्षण मागणीसाठी मोर्चा
3 साखर कामगारांचा शुक्रवारी पुण्यात मोर्चा
Just Now!
X