पंढरपूर येथील कराडकर महाराज मठाचे मठाधिपती जयवंत पिसाळ यांची हत्या करण्यात आली आहे. बाजीराव जगताप यांनी ही हत्या केली असून मठाधिपतीच्या वादातूनच हा प्रकार घडला असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ सागर कवडे यांनी दिली आहे. पंढरपूर येथे राज्यातील अनेक महाराजांचे मठ आहेत. यातील कराड येथील कराडकर महाराज मठामध्ये हत्या करण्यात आली असल्याचं समोर आलं आहे. चाकूने वार करत ही हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

जयवंत पिसाळ कराडकर महाराज मठाचे मठाधिपती होते. मात्र या मठाच्या मठाधिपतीमध्ये वाद होता. अशातच आज कराडकर महाराज मठात एक मृतदेह पडला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून तात्काळ पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलीस पोहोचले असता मृतदेह मठाधिपती पिसाळ महाराजांचा असल्याचं समोर  आलं. पोलिसांनी तपास केला असता बाजीराव जगताप आणि जयवंत पिसाळ यांचात वाद होता अशी माहिती समोर आली. त्यावरून पोलिसांनी बाजीराव जगताप यांना ताब्यात घेतलं. चौकशी केली असता हत्या केल्याची कबुली जगताप यांनी दिली. जगताप यांनी यापूर्वी कराडमध्ये एकजणाच्या डोक्यात वीणा घातली होती.

बाजीराव जगताप यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे

या प्रकरणी बाजीराव जगताप यांच्याविरोधात पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. असे असले तरी शहारातील मठाधिपती यांची हत्या आणि मठातील वाद चव्हाट्यावर आल्याने उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे