News Flash

सातारा शहराला पाणीपुरवठा करणारा कास तलाव पूर्ण क्षमतेने भरला

सातारकरांवरील पाणी टंचाईचे संकट दूर

सातारा : येथील प्रसिद्ध कास तलाव संततधार पावसामुळे रविवारी पूर्ण क्षमतेने भरला.

सातारा शहराला पाणीपुरवठा करणारा कास तलाव रविवारी पूर्ण क्षमतेने भरल्याने त्याच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. यामुळे सातारकरांवरील पाणी टंचाईचे संकट यामुळे दूर झाले आहे.

कास परिसरात महिनाभरापासून सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे तलावाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली होती. गुरुवारपासून कास परिसरात सतत पावसाची रिमझीम सुरु होती. शनिवारी पावसाने जोरदार हाजेरी लावल्याने शनिवारी मध्यरात्री कास तलाव भरून पाणी सांडव्यावरून वाहू लागले. यामुळे सातारकरांना आता वर्षभरासाठी पूर्ण क्षमतेने पाणीसाठा उपलब्ध झाल्याने दिलासा मिळाला आहे.

सातारा शहराचा वाढता पसारा आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन नागरिकांची पाण्याची गरज भागावी यासाठी कास धरणाच्या भिंतीची उंची वाढवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. त्यानुसार, गेल्या तीन वर्षांपासून हे काम सुरु करण्यात आले असून साठ टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे. हे काम पूर्ण झाल्यानतंर सध्याच्या पाणी साठ्याच्या तिप्पट साठा या धरणात उपलब्ध होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 6, 2020 9:51 am

Web Title: kas lake which supplies water to satara city filled to its full capacity aau 85
टॅग : Monsoon
Next Stories
1 विकास दुबे आपल्यासाठी ‘नेपाळमधील दाऊद’ ठरू नये म्हणजे मिळवले, शिवसेनेची योगी आदित्यनाथांवर टीका
2 गर्दीचे कारण देत भाईंदरमधील वृत्तपत्र विक्रेत्यावर गुन्हा
3 रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातील तीन कर्मचाऱ्यांना करोनाची लागण 
Just Now!
X