कल्याण डोंबिवली महापालिकेच्या माजी महापौर कल्याणी पाटील यांचं स्वाईन फ्लूने निधन झालं. मागचे १५ दिवस त्या स्वाईन फ्लूने आजारी होत्या. २०१३ ते १५ च्या दरम्यान त्या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महापौर होत्या. त्यांना स्वाईन फ्लू झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या कल्याणी पाटील यांना परभाव झाला होता. भाजपाच्या सुमन निकम यांनी फक्त ५० मतांनी पराभव केला होता. कल्याणी पाटील या सोशल मीडियावर सक्रिय होत्या. गेल्या तीन ते चार दिवसांपासून कल्याणी पाटील यांची प्रकृती खालावली होती. अखेर आज त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
१ जून ते १८ ऑगस्ट या कालावधी गेस्ट्रोमुळे १४१, कावीळ १३७, टायफॉईड ३५०, लेप्टोस्पायरोसीसचे ३, मलेरिया १०८ तर स्वाईन फ्लू चे ३७ रुग्ण आढळले आहेत. स्वाईन फ्लूच्या ३७ पैकी तीन रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती एका वृत्तसंस्थेने दिली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 10, 2019 7:32 pm