आनंद दिघे यांच्या मृत्यूबाबत माजी खासदार आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नीलेश राणे यांनी गंभीर आरोप केले असतानाच आता आनंद दिघे यांचा पुतण्या केदार दिघे यांनी नीलेश राणे यांना फटकारले आहे. ‘दर पाच वर्षांनी निवडणुकीत आनंद दिघे यांच्या मृत्यूचा विषय उकरुन काढला जातो आणि निवडणुकीनंतर विषय संपुष्टात येतो. नीलेश राणे यांनी हे गंभीर आरोप का केले हे मलाही माहित नाही, पण जर त्यांच्याकडे यासंदर्भातील काही पुरावे असतील तर ते जनतेसमोर आणावेत’, अशा शब्दात केदार दिघे यांनी नीलेश राणेंना सुनावले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नीलेश राणे यांच्या आरोपांवर केदार दिघे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. केदार दिघे हे आनंद दिघे यांचे पुतणे आहेत. केदार दिघे म्हणाले, बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्यातील संबंध जगजाहीर होते. फक्त शिवसेनाच नव्हे तर सर्वच स्तरातील लोकांना दोघांमधील जिव्हाळ्याचे संबंध माहित होते. आनंद दिघे यांचा पुतण्या म्हणून मला इतकेच वाटते की नीलेश राणे यांच्याकडे आनंद दिघे यांच्या मृत्यूसंदर्भातील कोणतेही पुरावे असतील तर ते त्यांनी जनतेसमोर आणावे. अन्यथा निवडणुकीपूरता या विषयावर विधान करणे योग्य नाही, असेही केदार दिघे यांनी म्हटले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kedar dighe nephew of anand dighe reaction nilesh rane explosive mark
First published on: 16-01-2019 at 18:24 IST