News Flash

“राजा उदार झाला हाती भोपळा दिला…आजच्या मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचा हा अर्थ ”

भाजपा प्रवक्ते केशव उपाध्येंची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका

(संग्रहित छायाचित्र)

राज्यातील वाढत्या करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज(मंगळवार) फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधताना राज्यात १५ दिवसांसाठी लॉकडाउची घोषणा केली आहे. १४ एप्रिल रोजी रात्री ८ वाजल्यापासून १ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत राज्यात पूर्णपणे संचारबंदी असणार आहे. मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना संचारबंदीच्या काळात काय बंद असणार? कोणत्या सेवा सुरू राहणार? याबाबत देखील माहिती दिली. तर, मुख्यमंत्र्यांनी आज केलेल्या भाषणावर भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी टीक केली आहे.

Maharashtra Lockdown Guidelines : महाराष्ट्रात उद्या रात्रीपासून लॉकडाउन; मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

“राजा उदार झाला हाती भोपळा दिला…आजच्या मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचा हा अर्थ आहे. महाराष्ट्रातील मोठा वर्ग महाराष्ट्रात उद्यापासून सुरू होणाऱ्या लॅाकडाउनमुळे बाधित होणारं आहे. मात्र मदतीचा देखावा केला तरी तुटपुंज्या मदतीत हा वर्ग वंचित रहाणार आहे.” असं केशव उपाध्ये यांनी ट्विट केलं आहे.

हवाई मार्गाने ऑक्सिजन आणण्यासाठी केंद्राने मदत करावी, मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांकडे मागणी

Maharashtra Lockdown : राज्यात संचारबंदीत लोकल, बससेवा सुरू राहतील पण ….

याशिवाय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील राज्यात १५ दिवसांच्या लॉकडाउनच्या निर्णयावर प्रतिक्रिया देत, ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

राज्यात १५ दिवसांसाठी लॉकडाउनच्या निर्णयावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

“लॉकडाउनची घोषणा केली असली तरी सध्याची आरोग्यव्यवस्था सुधारण्याला राज्य सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे. व्हेंटिलेटर्स, रेमडेसिवीर, ऑक्सिजन, ऑक्सिजनेटेड बेड्स तसेच साध्या बेड्सच्या उपलब्धतेकडे प्राधान्याने लक्ष दिले पाहिजे. तरच रूग्णांची परवड थांबेल. कोविड प्रतिबंधासाठी जो ३३०० कोटी रूपयांचा निधी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला, तो बजेट घोषणेसारखा न ठेवता, तत्काळ बेड्स आणि वैद्यकीय उपकरणांच्या उपलब्धतेसाठी, तत्काळ विनियोग तत्त्वावर वापरला गेला पाहिजे. तशी परवानगी सुद्धा राज्य सरकारने दिली पाहिजे.” असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 13, 2021 11:10 pm

Web Title: keshav upadhyay criticized chief minister uddhav thackeray msr 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 Coronavirus : राज्यात करोनाचा उद्रेक! तब्बल ६० हजार २१२ करोनाबाधित वाढले
2 राज्यात १५ दिवसांसाठी लॉकडाउनच्या निर्णयावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3 Maharashtra Lockdown : राज्यात संचारबंदीत लोकल, बससेवा सुरू राहतील पण ….
Just Now!
X