12 August 2020

News Flash

..तर शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करण्यास तयार – खडसे

कामगारांनी दारूबंदी उठविण्याची मागणी केल्याचेही खडसे यांनी नमूद केले.

शेतकरी आत्महत्या होणार नाहीत याची हमी द्या!

सात-बारा कोरा केल्यानंतर शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणार नाहीत याची विरोधक हमी देत असतील तर आम्ही त्यासाठी तयार आहोत, असे उत्तर राज्याचे महसूल व कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी त्यांच्यावर होणाऱ्या टिकेला दिले.
अलिकडेच शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मराठवाडय़ातील दुष्काळी भागाचा दौरा करताना शासनाची मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहचलीच नसल्याचा आरोप केला होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न उचलून धरत सात-बारा कोरा करण्यास राज्य सरकार तयार नसल्याबद्दल टीका केली आहे. गुरूवारी मुक्ताईनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत खडसे यांनी विरोधकांच्या आरोपांना उत्तर दिले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा खरोखरच चिंतेचा विषय असला तरी सातबारा कोरा करणे किंवा संपूर्ण कर्जमाफी हे त्यावर पर्याय होऊ शकत नाही. हा अनुभव याआधीही आला असल्याचे खडसे यांनी निदर्शनास आणून दिले. राज्यात तूर्तास दारूबंदी शक्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ठरवून दिलेल्या अटी व शर्तीनुसार गावांनी मतदानाव्दारे दारूबंदीची मागणी केल्यास त्या त्या गावात दारूबंदी करता येते. चंद्रपूर, गडचिरोली यांसारख्या जिल्ह्य़ांमध्ये दारूबंदी करण्यात आली असली तरी तेथील अनेक खाण कामगारांनी दारूबंदी उठविण्याची मागणी केल्याचेही खडसे यांनी नमूद केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 4, 2015 1:53 am

Web Title: khadse ready to clarify farmer document
Next Stories
1 दिवाळी अंकांचे स्वागत शब्दस्पर्श
2 मुरुड किनाऱ्यावर संशयित बोटी
3 सहलीसाठी गेलेले महाराष्ट्रातील ६४ शालेय विद्यार्थी चेन्नईत अडकले
Just Now!
X