News Flash

‘विकासाच्या नावावर घरा-दारावर वरवंटा फिरवू नका’

खंबाटकी घाटातील नव्या बोगद्याला शेतकऱ्यांचा विरोध

मुंबई-बंगळुरू महामार्गावर खंबाटकी घाटाला पर्याय म्हणून साताऱ्याहून पुण्याच्या दिशेने येताना हा बोगदा उभारण्यात येणार आहे.

खंबाटकी घाटातील प्रस्तावित असणाऱ्या नव्या बोगदयासाठी जमीन देण्यास शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. मुंबई-बंगळुरू महामार्गावर खंबाटकी घाटाला पर्याय म्हणून साताऱ्याहून पुण्याच्या दिशेने येताना हा बोगदा उभारण्यात येणार आहे. साताराकडे जाताना खंबाटकी घाटातून जावे लागते. यासाठी खंबाटकी बोगदयानजीक नवा बोगदा तयार करण्यात येणार आहे.

यासाठी खंडाळा व वाण्याची वाडी येथील शेतकऱ्यांना विश्वासात न घेता महामार्ग प्राधिकरण जमिनीची मोजणी करत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. विकासाला विरोध नाही, परंतु याच परिसरात खंबाटकी बोगदा व रस्त्यासाठी जमीन दिली आहे. धोम बलकवडी कालव्यासाठीही जमीन दिली.आता पुन्हा दुसरा बोगदा आणि रस्त्यासाठी २१० फूट जागा आरक्षित होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर अल्पभूधारक होण्याचे संकट निर्माण झाले आहे. या प्रस्तावित बोगद्याच्या पार्श्वभूमीवर काहींना शेतीच राहणार नाही. विकास हवा पण ‘घरादारावर वरवंटा फिरवून नको ,असे मत स्थानिकांनी व्यक्त केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2017 7:15 pm

Web Title: khambatki ghat tunnel issue local people protest new protests
Next Stories
1 गिरीश महाजन बंदूक घेऊन बिबट्याच्या मागावर; व्हिडिओ व्हायरल
2 अनिकेत कोथळेच्या भावांचा पोलीस ठाण्याबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न
3 लातूर-नांदेड मार्गावर क्रुझर-टेम्पोचा भीषण अपघात; ७ ठार, १३ जण गंभीर जखमी
Just Now!
X