मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर वाहतूक विस्कळीत झाली आहे. खंडाळा येथे मदुराई एक्सप्रेसचा एक डब्बा रुळावरुन घसरल्यामुळे मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे गाडया १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहेत तसेच काही गाडया रद्द झाल्या आहेत. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झालेले नाही.
मदुराई एक्सप्रेस पुण्याच्या दिशेने जात असताना मध्यरात्री पावणेतीनच्या सुमारास खंडाळा येथे डब्बा रुळावरुन घसरला. घसरलेला डब्बा मार्गावरुन हटवण्यात आला असून पावणेसहाच्या सुमारास मदुराई एक्सप्रेस पुण्याच्या दिशेने मार्गस्थ झाली.
अप मार्गावर पुण्याहून मुंबईच्या दिशेने येणारी रेल्वे वाहतूक व्यवस्थित सुरु आहे. पण मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या गाडया उशिराने धावत आहेत तसेच काही गाडया रद्द झाल्या आहेत. या अपघातामुळे मागच्या सगळया गाडयांचे वेळापत्रक कोलमडले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 6, 2018 7:14 am