28 September 2020

News Flash

कोल्हापूरनंतर पावसाचा मोर्चा खान्देशात; १४ तालुक्यांमध्ये अतिवृष्टी

सांगली आणि कोल्हापूरमध्ये जलसंकट आले असून त्यावर मात केली जात असताना खानदेशातही महापूर येण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी पूरग्रस्त स्थिती निर्माण झाली आहे. सांगली आणि कोल्हापूरमध्ये जलसंकट आले असून त्यावर मात केली जात असताना खानदेशातही महापूर येण्याची शक्यता आहे. धुळे व नंदुरबार जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजविला आहे. तापी, पांझरा, बुराई, अरुणावती, अनेर, कान आदी नद्यांना महापूर आला आहे.

खानदेशातील १४ तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली असून येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. आठ दिवसांपासून जळगाव, धुळे व नंदुरबार येथे कोसळणाऱ्या पावसामुळे पूरस्थित उद्भवली आहे. पावसामुळे आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक महामार्ग ठप्प झाले असून घरांची पडझडही झाली आहे.

अमळनेर, रावेर, जामनेर व जळगाव येथे चार नग फायबर बोटी व लाईफ जॅकेट, लाईफ रीग, सर्च लाईट, दोरखंड आदी साहित्य वितरीत करण्यात आले असून ते सज्ज ठेवण्यात आले आहे.

इथं झाली अतिवृष्टी –
नंदुरबार, तळोदा, शहादा, अक्कलकुवा, धडगाव, नवापूर या सर्व ६ तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. धुळे जिल्ह्यातही सर्व चार तालुक्यांत अतिवृष्टी झाली, तर जळगाव जिल्ह्यातील धरणगाव, यावल, अमळनेर, चोपडा या ४ तालुक्यांत अतिवृष्टी झाली. अमळनेर तालुक्याच्या काही गावांना जलसंकट उभे राहिले असून, कळमसरे गावास पाण्याचा वेढा पडला आहे.

अतिवृष्टीमुळे पिके धोक्यात आली आहेत. उडीद-मूगावर रोग पडू लागला असून कपाशीची रोपे पिवळी पडू लागली आहेत. याबाबत कृषी विभागाची बैठक शुक्रवारी पार पडली. त्यात तक्रार येईल, त्यानुसार पंचनामे सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संततधार पाऊस तसेच पांझरा व तापी नदीला आलेल्या पुरामुळे जिल्ह्यात आपत्कालीन परिस्थिती उद्भवण्याची शक्यता लक्षात घेऊन कर्मचाºयांच्या रजा, सुट्या रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. तसेच मुख्यालय न सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 10, 2019 5:20 pm

Web Title: khandesh flood heavy rainfall in khandesh nashik jalgaon and dhule nck 90
Next Stories
1 ‘त्या’ जीआरचा चुकीचा अर्थ काढण्यात आला-मुख्यमंत्री
2 महाराष्ट्रातील मराठी माणूस एकजुटीने संकटावर मात करतो हे जगाला दाखवू – शरद पवार
3 “अलमट्टी धरणाबाबत महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारमध्ये समन्वय”
Just Now!
X