06 July 2020

News Flash

मुलीचे अपहरण करणारी महिला ताब्यात

मुंबईतून एका ९ महिन्यांच्या मुलीचे अपहरण करून सांगलीत आश्रयास आलेल्या विजापूरच्या महिलेला रविवारी ताब्यात घेतले. या मुलीचे शुक्रवारी (दि.२९) अपहरण करण्यात आले होते.

| September 1, 2014 02:05 am

मुंबईतून एका ९ महिन्यांच्या मुलीचे अपहरण करून सांगलीत आश्रयास आलेल्या विजापूरच्या महिलेला रविवारी ताब्यात घेतले. या मुलीचे शुक्रवारी (दि.२९) अपहरण करण्यात आले होते.
याबाबत सांगलीतील विश्राामबाग पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, की गिरगावमधील मच्छी गल्लीत राहणाऱ्या सलमा ईस्माइल शेख या १९ वर्षांच्या तरुणीच्या ९ महिन्यांच्या यास्मिन नावाच्या मुलीचे राहत्या घरातून शुक्रवारी (दि.२९) अपहरण करण्यात आले होते. त्याच दिवशी व्ही.टी. रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. मुंबई पोलिसांनी संशयित महिलेच्या मोबाइल लोकेशनचा ठावठिकाणा सांगलीत असल्याचे आढळून आले होते. याबाबत सांगली पोलिसांना दूर संदेश यंत्रणेवरून संशयित महिलेचे छायाचित्र पाठवून तपासासाठी सूचना देण्यात आली होती.
विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय भांगे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने गोकुळनगरमध्ये छापा टाकून संशयित महिलेला अपहरण करण्यात आलेल्या ९ महिन्यांच्या यास्मिनसह ताब्यात घेतले असून याबाबत मुंबई पोलिसांना कळविण्यात आले आहे. अपहरण करण्यात आलेल्या मुलीच्या आईसह पोलीस संशयित महिलेला ताब्यात घेण्यासाठी उद्यापर्यंत सांगलीत येतील, असे सांगण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2014 2:05 am

Web Title: kidnaper woman arrested in sangli
टॅग Arrested,Sangli,Woman
Next Stories
1 हिंगोली जिल्ह्य़ात दमदार पाऊस
2 मोदींचा शिक्षक दिन; प्रचंड उत्सुकता अन् अनंत अडचणी!
3 तीन दिग्गजांचा गुरुवारी भाजपमध्ये प्रवेश
Just Now!
X