News Flash

अपहरणकर्त्यां नगरसेवकांना पोलीस कोठडी

न्यायालयात हजर केले असता येत्या ३१ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

जिल्हाप्रमुख महाडिक फरार

देवरुख नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवारांचे अपहरण केल्याचा गुन्हा दाखल झालेल्या शिवसेनेच्या दोन नगरसेवकांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, पक्षाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक यांच्यासह २३ जण फरारी आहेत.
गेल्या सोमवारी झालेल्या या निवडणुकीतील भाजपाचे उमेदवार नीलेश भुरवणे, राष्ट्रवादीचे नगरसेवक प्रफुल्ल भुवड आणि भाजपाचे शहराध्यक्ष कुंदन कुलकर्णी यांचे पूर्णगड येथील एका पर्यटन केंद्रातून अपहरण करण्यात आले होते. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महाडिक यांच्यासह नगरसेवक मनीष सावंत आणि मंगेश शिंदे त्यामध्ये सहभागी असल्याचे पोलिसांकडे नोंदवण्यात आलेल्या तक्रारीत नमूद केले होते. त्यानुसार पोलिसांनी तातडीने कारवाई करून दोन्ही नगरसेवकांना ताब्यात घेतले. त्यांना न्यायालयात हजर केले असता येत्या ३१ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दरम्यान, जिल्हाप्रमुख महाडिक यांच्यासह आणखी २३ जण मात्र फरारी असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2015 2:16 am

Web Title: kidnapper corporaters under police custody
टॅग : Police Custody
Next Stories
1 शेतीसाठी पक्ष्यांची गरज – सुरेश प्रभू
2 रायगड पोलीस मुख्यालयाच्या आवारात दुचाकीचा स्फोट, एका पोलिसाचा मृत्यू
3 लाच घेतल्याप्रकरणी साताऱ्यातील तहसीलदार महिलेला तीन वर्षांची शिक्षा
Just Now!
X