देशभरात करोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असून महाराष्ट्रातही अनेकांना करोनाची लागण झाली आहे. महाराष्ट्रात सध्याच्या घडीला करोनाचे किती रुग्ण आहेत, मास्क, आयसोलेशन बेड आणि व्हेंटिलेटर्सची काय स्थिती आहे ते जाणून घ्या…

– महाराष्ट्रात करोनाचे आजमितीस ८६८ रुग्ण असून ५२ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूदर देशात सर्वाधिक म्हणजे ५.९९ इतका आहे. मरण पावलेल्या ११ रुग्णांमध्ये इतर कुठल्याही आजारांची लक्षणे नव्हती.

– एकूण १७५६३ सॅम्पल्स तपासले असून १५८०८ सॅम्पल्सचे रिपोर्ट निगेटिव्ह आहेत.

– महाराष्ट्रामध्ये करोनाचे गांभीर्य लक्षात घेऊन वेळीच पावले उचलल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आहे.

– महाराष्ट्रात मुंबईमध्ये सर्वाधिक ५२५ रुग्ण असून ३४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्या खालोखाल पुणे येथे १३१ रुग्ण व पाच जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे विभागात ८३ रुग्ण असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

– महाराष्ट्रातील एकंदर ११ कोटी १९ लाख ६६ हजार ६३७ लोकसंख्येपैकी ८६८ कोरोनाचे रुग्ण आढळले असून प्रत्येक १० हजार लोकसंख्येमागे ०.०७७ असे रुग्ण आहेत.

– आढळलेल्या रुग्णांमध्ये ६३ टक्के पुरुष आणि ३७ टक्के महिला आहेत. मृत्यू पावलेल्यांमध्ये ३९.७५ टक्के पुरुष आणि १३.२५ टक्के महिला आहेत.

– दहाव्या आठवड्यात भारतात ४१२५ रुग्ण आढळले. इतर देशांची दहाव्या आठवड्यातील तुलना केली तर अमेरिकेत एक लाख २२ हजार ६५३, फान्समध्ये ३७ हजार १४५, जपानमध्ये एक हजार ६९३ आणि चीनमध्ये ८१ हजार ६०१ अशी आकडेवारी आहे.

– सध्या राज्यात 3 लाख 2 हजार 795 एन-95 मास्क, 41 हजार 400 पीपीई, 10 हजार 317 आयसोलेशन बेड, 2 हजार 666 आयसीयू बेड आणि 1 हजार 317 व्हेंटिलेटर्स आहेत.