देशासह महाराष्ट्रात करोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. देशासह राज्यांमध्ये १४ एप्रिलपर्यंत लॉकडाउन आहे. १४ एप्रिलनंतर लॉकडाउन संपणार का? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय संदेश दिला आहे. त्यानंतर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काय म्हटलं आहे. आज दिवसभरात काय काय घडलं जाणून घ्या
मातोश्री परिसरात करोनाचा एक रुग्ण सापडला आहे. हा परिसर तातडीने सील करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अंगरक्षकांची आणि मातोश्रीवरील कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी होणार आहे
मातोश्री परिसरात करोनाचा रुग्ण, मुख्यमंत्र्यांच्या अंगरक्षकांची वैद्यकीय तपासणी होणार
करोनामुळे मुंबईत आज चारजणांचा मृत्यू झाला. मुंबईतली रुग्णसंख्या ४९० वर पोहचली आहे
करोनाग्रस्तांची संख्या वाढल्याने मुंबई तिसऱ्या स्टेजच्या उंबरठ्यावर पोहचली आहे
“मुंबई तिसऱ्या स्टेजच्या उंबरठ्यावर; कम्युनिटी ट्रान्समिशन पहिल्या टप्प्यात रोखायला हवं”
आज सकाळी ११ च्या दरम्यान राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद पवार यांनी फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधला. तबलिगी जमातच्या मरकज या कार्यक्रमाला संमती द्यायला नको होती असं त्यांनी म्हटलं
तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला परवानगी देण्याची गरज नव्हती – शरद पवार
आज दुपारी १२ च्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपाच्या चाळीसाव्या वर्धापन दिनानिमित्त कार्यकर्त्यांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी देश करोनाशी लढण्यासाठी सज्ज असल्याचं म्हटलं. त्याचप्रमाणे करोनाचा अंधार दिव्यांनी दूर केला असंही स्पष्ट केलं.
करोनाविरुद्ध दीर्घ काळ चालणाऱ्या या मोठ्या लढाईसाठी देश सज्ज : नरेंद्र मोदी
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मोदींच्या दिवे लावा आवाहनाची तुलना जनसंघाच्या पणतीशी केली. एक ट्विट करुन त्यांनी टीका केली आहे.
आव्हाडांनी जोडली मोदींच्या दिव्यांची जनसंघाच्या पणतीशी नाळ
दरम्यान केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली ज्यामध्ये खासदारांचे तीस टक्के वेतन १२ महिन्यांसाठी कापण्याचा निर्णय झाला आहे. हा सगळा निधी करोनाशी लढा देण्यासाठी वापरला जाईल
मोठा निर्णय! खासदारांची वर्षभरासाठी ३० टक्के वेतन कपात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउन संपल्यानंतर दहा प्रमुख निर्णय तयार ठेवा असे मंत्र्यांना सांगत १४ तारखेला लॉकडाउन संपण्याचे संकेत दिले आहेत.
पंतप्रधानांनी लॉकडाउन न वाढवण्याचे दिले संकेत
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 6, 2020 8:09 pm