कोकण हे सर्वात मोठं ऑक्सिजन सेंटर आहे. तिथे रासायनिक कारखाने आणण्याचा निर्णय चुकीचा वाटतो. तसेच कोकणाकडे सर्वच राजकारण्यांचं दुर्लक्ष झालं आहे. अंतुले नसते तर आजही डोंगर तुडवत कोकणात जावं लागलं असतं आणि मधू दंडवते नसते तर रेल्वे कधी कोकणात पोहचली नसती, असं मत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं आहे. लोकसत्ताने आयोजित केलेल्या ‘दृष्टी आणि कोन’ या दूरसंवादमालेत बोलताना प्रकाश आंबेडकरांनी अनेक महाराष्ट्राचे भौगोलिक परिस्थितीनुसार विश्लेषण करताना कोकणावर अन्याय झाल्याची भावना व्यक्त केली.

एका कार्यक्रमामध्ये तुम्ही साचलेपण आलं आहे शिळेपण आलं आहे. ते सगळं तोडायला हवं असं तुम्ही एका कार्यक्रमामध्ये म्हणालात. तर यासंदर्भात तुमच्या मनात काय आहे? याचा काय राजकीय अर्थ घ्यायचा असा प्रश्न ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी प्रकाश आंबेडकरांना विचरला. त्यावर उत्तर देताना प्रकाश आंबेडकरांनी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या प्रदेशांबद्दल भाष्य केलं. सुरुवातच कोकणापासून करताना प्रकाश आंबेडकरांनी, “कोकणाकडे सर्वच राजकारण्यांचं दुर्लक्ष झालं आहे. अंतुले नसते तर आजही डोंगर तुडवत कोकणात जावं लागलं अशतं. तसेच मधू दंडवते नसते तर रेल्वे कधी कोकणात पोहचली नसती,” असं मत व्यक्त केलं.

नक्की वाचा >> Coronavirus : आपली परिस्थिती बांगलादेशपेक्षाही वाईट; प्रकाश आंबेडकरांचा ठाकरे, मोदी सरकारवर निशाणा

“कोकण हे ऑक्सिजन सेंटर आहे. ;चिपळूण, महाड आणि पेणला जो केमिकल झोन आणला तो अत्यंत चुकीचा भाग आहे असं मी मनतो. सर्वात मोठं ऑक्सिजन सेंटर असणाऱ्या कोकणमध्ये ऑक्सिजन टुरिझम कसं डेव्हलप करता येईल हे पाहण्याऐवजी तिथे रासायनिक कारखाने आणता आणि तिथं ऑक्सिजन कसा संपेल हे बघता. त्यावेळेस अशा निर्णयांना मी शिळेपणा असं म्हणतो,” असं स्पष्टीकरण प्रकाश आंबेडकर यांनी दिलं. इकलॉजीचा विचार करुन तज्ज्ञांच्या मदतीने कोकणाचा विकास केला पाहिजे. मात्र असं होताना दिसत नसल्याची खंत प्रकाश आंबेडकरांनी बोलून दाखवली.

आपण काजू कितीचे इम्पोर्ट करतो? तर साधारण १२ हजार कोटींचे काजू आपण इम्पोर्ट करतो. वेंगुर्ल्यापासून ते रोह्यापर्यंत कोकणात आपल्याला काजूचा आगार करता येईल. इथे काजूचं उत्पादन घेता येत नाही का? इथे आपण तीन ते चार हजार कोटींच्या काजूंची लागवड करु शकतो, असं मत प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केली.

नक्की वाचा >> करोनाविरुद्ध लढण्यासाठी आपण नैसर्गिक गोष्टींचा वापर का करत नाही?; प्रकाश आंबेडकरांचा सवाल

कोकण तीन दृष्टीने नटलेलं आहे असं सांगताना प्रकाश आंबेडकरांनी  कोयनाच्या खालचा कोकण पठार आहे तो मोकळाय असं सांगितलं. संगमेश्वरजवळ आलो तर फ्लोटींग एअरपोर्ट्स बांधता येतात. युरोपीयन देशांमध्ये ६० वर्षांवरील लोकांना बाहेर यावं लागतं कारण त्यांना थंडी सहन होत नाही. त्याच पद्धतीने आपल्याला  नोव्हेंबर ते मार्च दरम्यान ऑक्सिजन पुरवणारं ठिकाण म्हणून कोकणचा पर्यटनाच्या दृष्टीने विचार करता येईल. दुसरा विचार म्हणजे कोयनेच्या वरच्या भाग हा काजू, आंब्याच्या माध्यमातून विकास होऊ शकतो पण हे होत नाही, अशी खंत प्रकाश आंबेडकरांनी बोलून दाखवली.