23 February 2019

News Flash

कोल्हापूरमध्ये बस अपघातात एकाचा मृत्यू, १५ जखमी

शिरोळ तालुक्यात खासगी बसचा अपघात झाला असून या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून १५ महिला जखमी झाल्या आहेत. गणेश बेकरीची ही बस असून ही बस

गणेश बेकरीची ही बस असून ही बस कर्मचाऱ्यांना घेऊन जात होती.

कोल्हापूरमधील शिरोळ तालुक्यात खासगी बसचा अपघात झाला असून या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून १५ महिला जखमी झाल्या आहेत. गणेश बेकरीची ही बस असून ही बस कर्मचाऱ्यांना घेऊन जात होती.

गुरुवारी सकाळी गणेश बेकरीची बस कर्मचाऱ्यांना घेऊन कुरुंदवाड येथून निघाली. बसमध्ये एकूण ४० जण होते. सर्व जण गणेश बेकरीत कामाला जात होते. कुरुंदवाडीपासून ५ किलोमीटर अंतरावर असलेले अरुंद पुल ओलांडताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. यानंतर बस रस्त्यालगतच्या शेतात घुसली आणि बस उलटली. या अपघातात चालकाच्या शेजारी बसलेल्या काशीनाथ बेरड (वय २८) या तरुणाचा मृत्यू झाला. तर बसमधील १५ महिला जखमी झाल्या. त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही बस सुरज लकडे यांची असून त्यांनी ही बस भाडेतत्त्वावर दिली होती. दत्ता बले हे या बसचे चालक होते.

शिरोळ तालुक्यातील अपघाताच घटना ताजी असतानाच कोल्हापूर – सांगली रस्त्यावर हातकणंगलेत राज्य परिवहन मंडळाच्या शिवशाही बसने एसटी बसला धडक दिली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दोन्ही बसमधील सर्व प्रवासी सुखरुप असल्याचे स्थानिक प्रशासनाने सांगितले.

आठवडाभरात एसटी बसच्या अपघाताची ही दुसरी घटना आहे. मंगळवारी पेणमधील वरवणे येथे समोरुन येणाऱ्या वाहनाला वाचवण्याच्या प्रयत्नाच एसटी बसचा अपघात झाला होता. यात १० प्रवासी जखमी झाले होते.

First Published on July 12, 2018 9:44 am

Web Title: kolhapur accident of bus in shirol one passenger dead several injured