29 September 2020

News Flash

कोल्हापूरमध्ये ट्रकची दुचाकीला धडक, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

ट्रकने धडक दिल्याने दुचाकीवरून जाणारे एकाच कुटुंबातील तिघेजण जागीच ठार झाले. हा अपघात शनिवारी सायंकाळी गगनबावडा तालुक्यातील वाकरे फाटा येथे झाला.

प्रातिनिधिक छायाचित्र

ट्रकने धडक दिल्याने दुचाकीवरून जाणारे एकाच कुटुंबातील तिघेजण जागीच ठार झाले. हा अपघात शनिवारी सायंकाळी गगनबावडा तालुक्यातील वाकरे फाटा येथे झाला. पती, पत्नी , मुलगा यांचा अपघातात मृत्यू झाला, तर दुसरा मुलगा जखमी झाला आहे. अपघातानंतर पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या ट्रक चालकास जमावाने पकडले.

लहू तायप्पा घाटगे (वय ३८) , त्यांची पत्नी अर्चना (वय ३२), मुलगा साईदीप ( वय ८) अशी मृत व्यक्तीची नावे आहेत. देवाशिष हा ५ वर्षाचा मुलगा अपघातातून बचावला.

लहू घाटगे यांचा सदानंद ट्रान्सपोर्ट नावाचा वाहतुकीचा व्यवसाय आहे. त्या कामासाठी ते दुचाकीवरून कुटुंबियांसह कोल्हापूरहून गगनबावडा येथे दुचाकीवरून ( एमएच ०९ ई ई ३६८६ ) वरून निघाले होते. ते वाकरे फाटा येथून जात असताना मागून आलेल्या ट्रकने ( एमएच ०७ ए ३ – ४११३ ) जोरदार धडक दिली. त्यामध्ये पती , पत्नी , मुलगा यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातातील ट्रक कोल्हापूरहून फोंडा येथे निघाला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 29, 2018 10:16 pm

Web Title: kolhapur accident three family members death
Next Stories
1 अंगावर वीज पडल्याने चार महिला गंभीर जखमी
2 खंडोबाच्या जेजुरी मंदिरावर सोन्याचा कळस बसवला जाणार
3 तुळजाभवानीचा डोळे दिपविणारा प्राचीन खजिना
Just Now!
X