राज्यात भाजपाच्या नेतृत्वाखाली नवे सरकार येण्याच्या घडामोडी मंगळवारी सुरू असताना करवीर नगरीत शासकीय अधिका-यांची बठक होऊन सर्व विभागांनी मंजूर निधी वेळेत खर्च करावा, असे जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी सांगितले. कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीची आढावा बठक राजर्षी शाहू सभागृह, शासकीय विश्रामगृह येथे झाली. यावेळी जिल्हाधिका-यांनी प्रशासनाला गतिमान कामकाज करण्याचे आवाहन केले. या बठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश डोके, कोल्हापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, जिल्हा नियोजन अधिकारी बी. एन. जगदाळे व्यासपीठावर उपस्थित होते.
सन २०१४-१५ या वित्तीय वर्षांतील अपूर्ण कामांची कामवार माहिती देऊन ती पूर्ण करण्यास सर्व विभागांनी प्राधान्य द्यावे, अशा सूचना दिल्या. तसेच, महिला व बालकल्याण विभागाने महिला व मुलींसाठी वैशिष्टय़पूर्ण उपक्रम राबवावेत, असेही माने यांनी यावेळी सांगितले. यावेळी डाटा बेस तयार करण्यासाठी गत पाच वर्षांतील आíथक व भौतिक साध्याची माहिती संकलन, आमदार स्थानिक विकास कार्यक्रम, डोंगरी विभाग विकास कार्यक्रम, खासदार स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रम, सर्व विभागांसाठी मंजूर निधी, खíचत निधी, अपूर्ण कामे, उपयोगिता प्रमाणपत्रे या बाबींवर चर्चा करण्यात आली.
सन २०१५-१६ साठी सर्वसाधारण जिल्हा वार्षकि योजनेअंतर्गत नियोजन करून त्याचा विभागवार प्रारूप आराखडा जिल्हा नियोजन विभागाकडे लवकरात लवकर पाठवावा, असे जिल्हा नियोजन अधिकारी बी. एन. जगदाळे यांनी स्पष्ट केले. या बठकीसाठी कृषी विकास, पशुसंवर्धन, आरोग्य, शिक्षण, समाजकल्याण, नगररचना, सार्वजनिक बांधकाम, क्रीडा, जिल्हा उद्योग केंद्र, पाटबंधारे विभागासह जिल्ह्यातील सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.