कोल्हापूर : करोनाने मृत झालेल्या व्यक्तीच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरीचा तपास प्रलंबित असताना अशाच प्रकारच्या चोरीच्या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. कोल्हापुरातील एका नामवंत कोविड रुग्णालयात उपचार घेत असलेल्या महिला रुग्णाच्या अंगावरील सुमारे अडीच लाख रुपये किंमतीच्या सोन्याचे दागिने चोरट्याने लांबवले.
कदमवाडी येथील एका महिला येथील महाराणा चौकात असलेल्या नामवंत कोविड १९ रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. प्रकृती गंभीर झाल्याने तिला याच रुग्णालयामधील आयसीयू विभागात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. मात्र त्याचवेळी अंगावरील पाटल्या, मंगळसूत्र, कर्णफुले, बुगड्या असा सात तोळ्यांचे दागिने चोरीस गेले. हा प्रकार बुधवारी रात्री उशिरा उघडकीस आला असून, याविषयी नातेवाईकांनी गुरुवारी लक्ष्मीपुरी पोलिसात फिर्याद दिली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 17, 2020 7:37 pm