एकीकडे राज्यात खरीप हंगामातील पीक कर्ज वाटपाचे प्रमाण घटल्याच्या तक्रारी असताना, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सबंध देशात अव्वल ठरली आहे. इष्टांकाच्या २०८ टक्के खरीप पीककर्जाचे वाटप करीत बँकेने हा बहुमान मिळविला आहे.  ६८६ कोटीचा इष्टांक असलेल्या या बँकेने तब्बल १४२९ कोटी रुपये खरीप पीक कर्जाचे वाटप केले आहे.

महाराष्ट्रासह संबंध देशातच खरिपाच्या पिककर्ज वाटपामध्ये राष्ट्रीयीकृत बँकांनीही हात आखडता घेतला आहे. अशा परिस्थितीत या बँकेने केलेले उच्चांकी कर्ज वाटप केले आहे. ही बाब मागील  पावसाळ्यात अतिवृष्टीने आलेला महापूर व गेल्या तीन महिन्यात करोनामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला आधार देणारी आहे.

gadchiroli lok sabha marathi news, gadchiroli lok sabha election marathi news
७ हेलिकॉप्टर, १५ हजारांहून अधिक जवान, गडचिरोलीत युद्ध क्षेत्राचा भास व्हावा…..
percentage of voting in Mumbai,
मुंबई, ठाणे, नागपूर, पुणे शहरांतील मतदानाचा टक्का वाढणार कसा ? मतदारांचा निरुत्साह दूर करण्यावर निवडणूक आयोगाचा भर
mumbai pune share 51 percent of total sales in housing market
घरांच्या बाजारपेठेत मुंबई, पुण्याचा ५१ टक्के वाटा; तिमाहीत सात महानगरांत १.३० लाख घरांची विक्री
Gadchiroli district is worst affected by wildfires
जागतिक वनदिन विशेष: वणव्यांमध्ये गडचिरोली जिल्ह्याची सर्वाधिक होरपळ 

शेतकरी मालक व आम्ही विश्वस्त
बँकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरीच या बँकेचा मालक आहेत. आम्ही फक्त विश्वस्त आहोत. शेतकऱ्यांना काही द्यावयाचा विषय तो त्यावेळी ही बँक नेहमीच अग्रेसर राहिली आहे.