मुसळधार पाऊस, कोयनेतील विसर्गामुळे पूरग्रस्तस्थिती निर्माण झाली. सांगली आणि कोल्हापूरमधील जनजीवन पूर्वरत करण्यावर सध्या सरकारने भर दिला आहे. विरोधकांनी पूरस्थितीचं राजकारण करू नये. सर्वांनी एकत्र येऊन लोकांना मदत करावी. सरकारच्या उणिवा दाखवून द्या पण राजकारण करू नका, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेत्यांना केलं आहे. आपल्याला राजकारण करण्यासाठी बराच वेळ आहे. सध्या राजकारण करण्याची ही योग्य वेळ नव्हे, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.

कोल्हापूर आणि सांगलीत यावर्षी विक्रमी पाऊस झाला. पूरस्थिती इतकी भीषण होती की तिथे जाणे कुणालाही शक्य नव्हते. अशाही परिस्थितीत गिरीश महाजन त्या ठिकाणी गेले. त्यांनी पूरग्रस्तांची भेट घेऊन त्यांना दिलासा दिला. त्यांनी कोणताही सेल्फी घेतला नाही. बोटीमधून सोडायला येणाऱ्यांना त्यांनी हात दिला होता. ते फुटेज एडिट करुन गैरवापर करण्यात आला असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे आणि विरोधकांच्या टीकेला उत्तर दिले.

आज शनिवारी सांगलीमधील पूरग्रस्त भागाची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली. त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी कोल्हापूर आणि सांगलीमधील पूरग्रस्त भागात केल्या जाणाऱ्या मदतीची माहिती दिली.

मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील ठळक मुद्दे –

– परवा हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी परवानगी मिळाली नव्हती
सांगली ९ दिवसांमध्ये ७५८ टक्के पाऊस पडला आहे
– कोल्हापुरात ९ दिवसांत ४८० टक्के पाऊस
– ९ दिवसांमध्ये कोयना धरण ५० टक्के भरलं
– कोयना धरनातून मोठा विसर्ग
– २००५ च्या तुलनेत कोल्हापूर आणि सांगलीमध्ये तीन पट पाऊस पडला
– ३१ दिवसाचा पाऊस नऊ दिवसांत पडला
– विक्रमी पाऊस झाल्यामुळे पूरस्थिती उद्भवली
– अनेक राज्यातून बचावपथकं कोल्हापूर-सांगलीमध्ये दाखल
– एनडीआरएफच्या टीमद्वारे युद्धपातळीवर मदत
– सांगलीत एकूण ९५ बोटीद्वारे बचावकार्य सुरू
– शिरोळ तालुक्यात आणखी लोक अडकले आहेत
– २७ हजार हेक्टर जमिनीवर पुराच्या पाण्याचा फटका
– सांगली आणि कोल्हापूरमधून जवळजवळ साडेतीन लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवले
– ४४८ किमी रस्ते पावसामुळे खराब
– ब्रह्मनाळमध्ये बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत १२ मृत्युमुखी, ८ बेपत्ता, दोन जखमी.
– नेव्हीच्या माध्यमातून मदतकार्य करू २८ हजार ५२७ कुटुंब परामुळं विस्थापित करण्यात आली आहेत.
– लोकांना अन्नधान्य पोहचवण्यावर सरकारचे लक्ष
– मदतीसाठी घरात दोन दिवस पाणी असावे, ही अट शिथील करण्यात आली
– काही मदत कॅशद्वारे काही मदत बँकेद्वारे
– आतापर्यंत १५३ कोटींची मदत
– मृताच्या नातेवाईकाला पाच लाखांची मदत
– जनावर गमावलेल्या लोकांच्या मदतीतही वाढ
– प्रत्येक गावात डॉक्टर आणि दोन फार्मासिस्ट
– मृत जनावराची लवकरात लवकर विल्हेवाट लावली जाईल
– शेतीतला गाळ काढण्यासाठी प्रतिहेक्टर १३ हजाराची मदत
– खरवडून गेलेल्या जमिनीसाठी प्रतिहेक्टर ३८ हजाराची मदत
– सिद्धिविनायक, शिर्डीसारख्या संस्थानकाकडून मदत
– वीज- पाणी पुरवठा सुरळीत करण्यावर भर
– गाव दत्तक घेऊन सरकारसोबत काम करण्याची इच्छा असल्यास आम्हाला कळवावे
– कमीत कमी पुराव्याच्या आधारे मदत दिली जाणार
– केंद्र सरकारची संपूर्ण मदत
– अनेक राज्यात सध्या पूरस्थिती
– १०० डॉक्टरांची टीम पूरग्रस्त भागात कार्यरत
– या परिस्थितीचे राजकारण करू नये
– विरोधीपक्षाने या परिस्थितीचे राजकारण करू नये
– सर्वांनी एकत्रित मदत करण्याच प्रयत्न केला पाहिजे
– विरोधी पक्षाने राजकारण करू नये, आपल्याला राजकारण करायला दुसरीकडे पुष्कळ जागा आहे
– परिस्थिती बिकट आहे, या परिस्थिती कुणी राजकारण करू नये
– कर्नाटक सरकारने वेळोवेळी मदत केली
– आलमट्टी धरणाच्या विसर्गाबाबत पहिल्या दिवसापासून कर्नाटक सरकारशी संपर्कात आहोत. त्यांच्याही अडचणी आहेत, मात्र कर्नाटक सरकारने हळूहळू विसर्ग वाढवून 5 लाख 30 क्यूसेक केला आहे. दोन्ही राज्य पूर्णपणे एकमेकांना मदत करत आहेत.