कोल्हापूर येथील राजर्षी शाहू स्मारक भवनचे व्यवस्थापक कृष्णाजी हरगुडे यांनी घरातील एकुलत्या एक मुलाचे लग्न अतिशय साध्या पद्धतीने केले.  लग्नात होणारा खर्च त्यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून करोना महामारीमुळे संकटात आलेल्यांच्या मदतीसाठी दिला. त्यांनी ही रक्कम पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे सुपूर्द केली.

कोणताही बडेजाव न करता  चिरंजीव आदित्य हरगुडे व वधू रसिका यांचे लग्न साधेपणाने करण्यात आले.  लग्नासाठी येणारा खर्च टाळून  करोनामुळे अडचणीत आलेल्या लोकांसाठी मदत करण्यात आली.  कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे वर व वधुंच्या यांच्या हस्ते 51 हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.

करोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह देशभर नवे संकट निर्माण झाले.  सरकारकडून दानशूरांना मदतीचे आवाहन करण्यात आलेले आहे. या पार्श्वभूमीवर हरगुडे यांनी घेतलेल्या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

यावेळी कृष्णाजी हरगुडे, रंजना हरगुडे, पी. एन. हरगुडे, सुधा हरगुडे, गुलाबराव घोरपडे, वसंतराव मुळीक, अनिल म्हमाने, सुरेश केसरकर, बबनराव रानगे, डॉ. दयानंद ठाणेकर, पंकज खोत, संतोष केसरकर, सुचेता केसरकर, डॉ. उत्तम राऊत, अवधूत पाटील आदी उपस्थित होते.