कोल्हापूरमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत महापौर शोभा बोंद्रे यांना धक्काबुक्की करण्यात आल्याची घटना घडली आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचे सुरक्षारक्षक आणि पोलिसांकडून धक्काबुक्की झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी कोल्हापुरातील मानाच्या तुकाराम माळी गणपतीचं चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं. यावेळी महापौर शोभा बेंद्रेही उपस्थित होत्या. मानाच्या गणपतीचं पूजन झाल्यानंतर विसर्जन मिरवणुकीला सुरूवात झाली, त्याचवेळेस महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचे सुरक्षारक्षक आणि पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप आहे. या घटनेवर स्वत: महापौरांनी संताप व्यक्त केला असून या प्रकारामुळे विसर्जन मिरवणुकीवेळी काही काळ तणाव निर्माण झाला होता. या घटनेचा त्यांनी निषेध केला आणि या पुढे सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हायचं की नाही हे ठरवावं लागेल, असंही त्या म्हणाल्या.

Action taken by Tihar administration after Delhi Chief Minister Arvind Kejriwal  blood sugar rises
केजरीवालांना इन्सुलिन; रक्तातील साखर वाढल्यानंतर तिहार प्रशासनाकडून कार्यवाही
eknath shinde
महायुतीच्या सर्व जागा बहुमताने निवडून येणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा, म्हणाले ‘शेतकऱ्यांना मदत…’
If you want to talk negatively leave gathering says Minister Chandrakant Patil
नकारात्मक बोलायचे असेल तर मेळाव्यातून बाहेर जा; मंत्री चंद्रकांत पाटील यांची महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना तंबी
aap party leader aatishi
‘आप’च्या नेत्या आतिशी यांना नोटीस; भाजपवर केलेल्या आरोपांबाबत उत्तर देण्याचे निर्देश