07 August 2020

News Flash

मंदिरात चोऱ्या करणारा अट्टल चोरटा कोल्हापूर पोलिसांनी पकडला

विविध मंदिरांमधली चोरीचे आणखी गुन्हे उघड होण्याची पोलिसांनी वर्तवली शक्यता

संग्रहित प्रतिकात्मक छायाचित्र

जिथे लोक नतमस्तक होऊन सुखी जीवनाचा आशीर्वाद मागताच त्याच मंदिरात घुसून, चोरी करणाऱ्या चोरट्यास शनिवारी कोल्हापूर पोलिसांनी पकडले. किरण भगवान मोहिते (वय 34) असे त्याचे नाव आहे.

याबाबत लक्ष्मीपुरी पोलिसांनी सांगितले की, किरण मोहीते यास मंगळवार पेठेतील शाहू दयानंद हायस्कूल येथे संशयितरित्या फिरताना ताब्यात घेतले. 15 जून रोजी महापालिके जवळील शनी मंदिराचा कडी-कोयंडा उचकटून त्याने दानपेटीसह रोख रक्कम लांबली होती. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हे निदर्शनास आले होते. या चोरीबाबत लक्ष्मी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता.

किरण मोहितेला ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्याची कारवाई सुरू झाली. शिवाय, त्याच्याकडून आणखी मंदिर चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस निरीक्षक अनिल गुजर यांनी व्यक्त केली आहे.

मंदिरातील दानपेटी फोडणारा अभिलेखावरील गुन्हेगार संशयित किरण मोहिते याने यापूर्वी रुईकर कॉलनी दत्त मंदिर, सह अनेक मंदिरात चोऱ्या केल्या आहेत.त्याचा दानपेटी फोडण्यात हातखंडा आहे. त्याच्यावर कोल्हापुरातील पोलिस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल असण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2020 8:48 pm

Web Title: kolhapur police have nabbed a thief who was robbing a temple msr 87
Next Stories
1 अल्पवयीन मुलाला पळवून नेत लैंगिक अत्याचार करणाऱ्या महिलेवर ‘पॉस्को’ अंतर्गत गुन्हा दाखल
2 १९६२ चं चीन युद्ध विसरु नका, शरद पवार यांचा राहुल गांधींना सल्ला!
3 करोनावर इंजेक्शन आहे मात्र ते आपल्याला परवडणारं नाही : शरद पवार
Just Now!
X