कोल्हापूर आणि सांगलीत पावसाने थैमान मांडला असून जनजीवन पुर्णपणे विस्कळीत झालं आहे. सांगलीत महापुराने बुधवारी सकाळी २००५च्या सर्वोच्च पातळीचा रेकॉर्ड मोडला आहे. तर आयर्विन पुलाजवळ ५५ फूट पाणी पातळीची नोंद झाली आहे. वाळवा तालुक्यातील बिचूद, रेठरे हरणाक्ष, बोरगाव, ताकारी, वाळवा, भिलवडी, औदुंबर येथील हजारो नागरिकांचे स्थलांतर करण्यात आलं आहे. कृष्णा आणि वारणा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. अनेक ठिकाणी वाहतुकीला फटका बसला असून मुंबई-पुणे-बंगळुरु महामार्गावरील वाहतुकही बंद पडली आहे.

कोल्हा’पुरात’ परिस्थिती गंभीर; नौदलाची पथके मदतीसाठी दाखल
पूरग्रस्तांची ना विचारपूस, ना मदतीचा हात
कोल्हापूर, सांगलीत पावसाचा कहर, बचावकार्य सुरु असताना बोट उलटली

कोल्हापूर आणि सांगलीमधील पुराचा फटका उद्या मुंबईकरांना बसणार आहे. उद्या मुंबईकरांना दूध मिळणार नाही. मुसळधार पाऊस आणि पुरामुळे कोल्हापूर आणि सांगलीमधून दुधाचा एकही टँकर नवी मुंबईत दाखल झालेला नाही. येथूनच हे दूध मुंबईभर पुरवलं जातं. कोल्हापूर-सांगलीमधून मुंबईत दर दिवशी १३ लाख लीटर दूध दाखल होतं. पण पुरामुळे वाहतुकीला फटका बसला असून कोल्हापुरातील दूध उत्पादन कंपन्यांनी दुधाचे संकलन थांबवलं आहे. त्यामुळे मुंबईत उद्या दूध येणार नाही.

संततधार पाऊस आणि पंचगंगा, कृष्णा, वारणा नद्यांना आलेल्या महापुरामुळे सांगली आणि कोल्हापूर या दोन शहरांमध्ये मंगळवारी महापुराचा हाहाकार उडाला. या दोन्ही शहरांतून अनुक्रमे ५१ हजार ७८५ लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. दरम्यान, आता राधानगरी धरणाचे सर्व दरवाजे बंद करण्यात आले असून नागरिकांना थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. तसेच गोवा कोस्टगार्डचे हेलिकॉप्टरही कोल्हापुरात एअरलिफ्टिंगसाठी दाखल झाले आहे. तसेच एनडीआरएफची पथकेही या ठिकाणी बचावकार्यात मदत करत आहेत.