बारावी पाठोपाठ कोल्हापूर विभागाचा दहावीचा निकाल विक्रमी लागला आहे. राज्यात कोल्हापूर विभागाने निकालात दुसरे स्थान मिळवले असून उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी ९३.८३ इतकी आहे. मुलांपेक्षा मुली उत्तीर्ण होण्याचे प्रमाण २.८५ टक्क्यांनी अधिक आहे. दहावीच्या परीक्षेत ६७ विद्यार्थ्यांचे गरव्यवहार मंडळाच्या निदर्शनास आले होते.
दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला. कोल्हापूर विभागात १४३७२७ इतक्या विद्यार्थ्यांची नोंद झाली होती. त्यापकी १४२४८८ इतके विद्यार्थी परीक्षेत बसले होते. उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या १३२६९२ इतकी आहे. तर टक्केवारीचे प्रमाण ९३.८३ टक्के आहे. कोल्हापूर विभागात तीन जि’ाांचा समावेश आहे. त्यामध्ये सर्वाधिक विद्यार्थी कोल्हापूर जि’ाातून उत्तीर्ण झाले असून त्याची टक्केवारी ९४.४५ टक्के इतकी आहे. दुस-या स्थानी असलेल्या साता-याने ९३.६० टक्के तर तिस-या स्थानी असलेल्या सांगली जि’ााचा ९३.१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यावर्षी परीक्षेला ९७६५६ इतकी मुले बसली होती. त्यापकी ७३७३९ मुले उत्तीर्ण झाली असून त्यांचे प्रमाण ९२.५७ इतके आहे. तर मार्चमध्ये झालेल्या परीक्षेवेळी ६२८३२ मुली परीक्षेस बसल्या होत्या. त्यापकी ५९९५३ इतक्या म्हणजे ९५.४२ टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या.