26 November 2020

News Flash

कोल्हापूरच्या सुपुत्राला पाकिस्तानच्या गोळीबारात वीरमरण; सुप्रिया सुळे यांनी केलं ट्विट

पाकिस्तानने केलेल्या भ्याड हल्ल्यात शहीद

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजकीय तणाव काही केल्या कमी होत नसल्याचं दिसून येत आहे. पाकिस्तानकडून ‘नापाक’ कुरापती सुरूच असून पाक लष्कराने शनिवारी पुन्हा एका शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाकिस्तानच्या सैनिकांनी केलेल्या गोळीबारात महाराष्ट्रातील कोल्हापूरच्या सुपुत्राला वीरमरण आले. शस्त्रसंधीचे उल्लंघन करत पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात कोल्हापूर जिल्ह्यातील जवान संग्राम शिवाजी पाटील हे शहीद झाले. गेल्या काही दिवसांपासून पाककडून सीमेवर कुरापती सुरूच आहेत. भारतीय लष्कराकडून पाकला चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे.

शनिवारी सकाळी पाक लष्कराने शस्त्रसंधी धुडकावून लावत अंदाधुंद गोळीबार केला. राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याने गोळीबार केला. यात कोल्हापूर जिल्ह्यातील जवान संग्राम पाटील शहीद झाले. त्यांना वीरमरण आल्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिय सुळे यांनी एक ट्विट केलं. “जम्मू काश्मीर येथील राजौरी भागात अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यात कोल्हापूर जिल्ह्यातील जवान संग्राम पाटील हे जवान शहीद झाले. संग्राम पाटील यांच्या या सर्वोच्च बलिदानास वंदन. पाटील कुटुंबीयांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली”, असं ट्विट करत त्यांनी या त्यागाला सलाम केला.

शहीद जवान संग्राम पाटील हे कोल्हापूर जिल्ह्यातील निगवे खालसा गावातील रहिवासी आहेत. १८ वर्षांपूर्वी ते लष्करात दाखल झाले होते. सैन्यदलातील ‘१६ मराठा बटालियन’मध्ये ते कार्यरत होते. संग्राम यांची १७ वर्ष सेवेची मुदत गेल्या वर्षी संपली होती. त्यानंतर त्यांनी दोन वर्ष मुदत वाढवून घेतली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 21, 2020 5:31 pm

Web Title: kolhapur soldier sangram shivaji patil martyer in ceasefire violation by pakistan in noushera sector kashmir ncp mp supriya sule pays homage vjb 91
Next Stories
1 महाराष्ट्रातही लव्ह जिहाद विरोधात कायदा आणा; किरीट सोमय्या यांची मागणी
2 “भाजपा सरकारच्या काळात ‘सीबीआय’ची पानटपरी झालीये”
3 आदिवासी व ग्रामीण भागातील रुग्णालये सेवाभावी संस्था रेडक्रॉसकडे देणार : राजेश टोपे
Just Now!
X