महिन्याभराच्या अंतराने कोल्हापुरातील पंचगंगा नदीचे पाणी दुसऱ्यांदा पात्राबाहेर पडले आहे. पावसाचा जोर वाढल्याने नदीच्या पाणी पातळी मध्ये वाढ होऊ लागली आहे. गेल्या २४ तासात नदीच्या पाणी पातळी सुमारे तीन फुटांनी वाढ झाली आहे. येत्या तीन दिवसांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील रेड आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून सावधानतेचा इशारा दिला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून धुवांधार पाऊस पडत आहे पश्चिमेकडील पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर अधिक आहे धरण आणि नदी पाणी नदी पाणी पातळी वाढत चालली आहे. कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत गेल्या चोवीस तासात तीन फुटांनी वाढ झाली आहे. नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. गेल्या महिन्यात २० जूनच्या दरम्यान जोरदार पाऊस झाला होता तेव्हा नदीचे पाणी पातळी नदीचे पाणी बाहेर आले होते. तेव्हाही कोल्हापूर जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले होते. पाणलोट क्षेत्रात जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याने धरणातील पाणी पातळीत वाढ झाली होती. धुवांधार पाऊस आणि धरणातून सोडलेले पाणी यामुळे नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली.

काल रात्रीपासून पावसाचा जोर आणखी वाढला आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय यांनी आज सकाळी ७ वाजता पंचगंगा नदीवरील राजाराम बंधारा पाणी पातळी २८ फुट १० इंच इतकी असल्याचे सांगितले. पंचगंगा नदी इशारा पातळी ३९ फूट व धोका पातळी ४३ फूट आहे. पावसाची गती पाहता सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यातील एकूण १७ बंधारे पाण्याखाली आहेत.

कळंबा तलावही ओव्हर फ्लो

कोल्हापुरातील पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर येऊ लागल्याने नदीची पाणी पातळी ३३ फूट ४ इंच होती. कळंबा तलावही ओव्हर फ्लो झाला. असून पाणी सांडव्यावरून वाहत आहे. गेली कित्येक दशके कोल्हापूर शहराची पाण्याची गरज पूर्ण करणारा कळंबा तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. त्याच्या सांडव्यावरून पाणी ओसंडून वाहू लागले आहे. पाणी पाहण्यासाठी व सांडव्यावरून ओसंडून वाहणाऱ्या पाण्यातील मासे पकडण्यासाठी गर्दी होऊ लागली असली तरी पोलिसांनी अशा लोकांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

जून महिन्याच्या मध्यास चांगला पाऊस होऊनही कळंबा तलावाला पाणलोट क्षेत्रातील ओढे-नाल्यातून पाणी फारसे आलेले नव्हते. जुलैतही तलावाची पातळी फारशी वाढलीही नव्हती.गेले पाच दिवस सुरू असलेल्या जोरदार वृष्टीमुळे तलावात मोठ्या प्रमाणावर पाणी येऊ लागले. अखेर आता तलाव भरून सांडव्यावरून पाणी वाहू लागले. पर्यटकांनी गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.