News Flash

सुप्रिया सुळेंविषयी फेसबुकवर आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या तरुणाला चोप

चुकीची लेखी माफी मागितल्यावर कार्यकर्त्यांनी त्या तरुणाला सोडून दिले

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या तरुणाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चोप दिल्याचा प्रकार घडला आहे. कोल्हापुरातील अक्षय तांबवेकर असे त्या तरुणाचे नाव आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे त्या तरूणाला घरी जाऊन चोप दिला आहे.

ईव्हीएम नको, अशी आमची भूमिका आहे, असं वक्तव्य सुळे यांनी केले होतं. याविषयीच्या बातमीची पोस्ट एका वृत्तवाहिनीच्या फेसबुक पेजवर करण्यात आली होती. त्याखाली कमेंटमध्ये अक्षयने सुप्रिया सुळेंविषयी आक्षेपार्ह शब्द वापरले होते. त्यानंतर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे कार्यकर्ते त्याच्या घरी पोहचले आणि त्याला चोप दिला.

एवढेचं नव्हे तर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस कार्यकर्त्यांनी अक्षयला कॅमेरासमोर आणि लिखित स्वरूपात माफी मागून घेतली. ‘सोशल मीडियावर केलेल्या चुकीच्या पोस्टबद्दल जाहीर माफी मागत आहे. आपल्याकडून झालेल्या चुकीची लेखी माफी मागितल्यावर कार्यकर्त्यांनी त्या तरुणाला सोडून दिले आणि त्याच्या पालकांना मुलावर लक्ष देण्याची विनंती केली. मिळालेल्या माहितीनुसार तो युवक उच्चशिक्षित आहे.

याचा एक व्हिडीओ युट्युबवर उपलबद्ध आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे कार्यकर्ते त्याच्या घरी पोहचले आहेत. त्याला कमेंटबद्दल जाब विचारला जातोय. त्याला यामध्ये मारहाण केल्याचेही दिसत आहे. दरम्यान, “घरात घुसून ठोकून काढीन” सुप्रिया सुळे आपल्या शब्दाला जागल्या. बोले तैसा चाले…. अशी पोस्ट करत महाराष्ट्र भाजपानं ट्विट करत टोला लगावला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 15, 2019 9:17 am

Web Title: kolhapur young boy derogatory facebook comment on mp supriya sule
Next Stories
1 चिमुकला वरद शहिदांच्या कुटुंबीयांसाठी निधी जमवतोय!
2 दुचाकींच्या अपघातात नवदाम्पत्यासह तिघे ठार
3 प्रणिता बोराचे चित्र पंतप्रधान कार्यालयात झळकले!
Just Now!
X