कोल्हापुरात घोडागाडी शर्यत आयोजित करण्यात आली होती. मात्र या शर्यतीत धावत्या गाडीतून पडल्याने एक तरूण जखमी झाला. त्याचे नशीब चांगले म्हणून तो बचावला अन्यथा त्याची काहीही खैर नव्हती. कागल तालुक्यातील माद्याळ याठिकाणी बैलगाडी आणि घोडागाडी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी घोडागाडी चालकाच्या अति उत्साहामुळे हा अपघात घडला.
या स्पर्धेच्या वेळी घोडा गाडी वेगाने धावत होती. त्यावेळी तरूण घोडागाडीमध्ये उभा राहिला. त्यावेळी त्याचा तोल गेला आणि तो खाली पडला. त्याच्या पाठोपाठ इतर घोडागाड्या आणि मोटरसायकल येत होत्या. त्यापैकी एका घोडागाडीचे चाक या तरूणाच्या अंगावरून गेले. ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेल्या ग्रामस्थांनी धावत जात या तरूणाला वाचवले नाहीतर या घटनेत त्याचा जीवही गेला असता.
पाहा व्हिडिओ
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 28, 2018 3:05 pm