19 October 2019

News Flash

कोल्हापुरात मलाबार ज्वेलर्सचे ७१ लाखांचे सोने, हिरे जप्त

सोमवारी पोलिसांनी ही कारवाई केली आहे

संग्रहित छायाचित्र

सराफी क्षेत्रात बडे नाव असलेल्या मलाबार ज्वेलर्सचे ७१ लाखांचे सोने आणि हिरे निवडणूक कार्यालयाच्या स्थिर निरीक्षक पथकाने (एसएटी) सोमवारी येथे जप्त केले. सरनोबतवाडी येथे बीव्हिसी सिक्युरिटीच्या व्हॅनमध्ये ही कारवाई करण्यात आली.

राजारामपुरी पोलिसांनी सांगितले कि, सोमवारी सकाळी सरनोबतवाडी येथील तपासणी नाक्यावर पोलिस पथकाने निळ्या रंगाची एक व्हॅन अडवली. ही व्हॅन मलाबार ज्वेलर्ससाठी दागिने वाहतूक करण्याचे काम करणारी असल्याचे व्हॅनमधील कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्यामध्ये पथकाला व्हॅनमध्ये एका कापडी पिशवीत ७१ लाखांचे दागिने आणि काही हिरे आढळले. पोलिसांनी दागिन्यांबाबत चौकशी केली असता, कागदपत्रांमध्ये विसंगती आढळली. पथकाने सर्व दागिने जप्त करून कर्मचाऱ्यांसह व्हॅन राजारामपुरी पोलिस ठाण्यात आणली.

सर्व दागिने अधिकृत असून, नियमित खरेदी-विक्रीचे असल्याचे कर्मचारी सांगत होते. ज्या बीव्हीसी कंपनीच्या व्हॅनमधून दागिने आणले होते, त्या व्हॅनच्या कराराबाबत एकही कागदपत्र उपलब्ध नव्हते. राजारामपुरी पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी याची माहिती दिल्यानात्र प्राप्तीकरचे पथक व निवडणूक कार्यालयाच्या पथकाने इन कॅमेरा पंचनामा केला. दागिने जप्त केल्याची माहिती मिळताच मालाबार ज्वेलर्सच्या अधिकाऱ्यांनीही राजारामपुरी पोलिस ठाण्यात धाव घेतली.

याबाबत पोलीस निरीक्षक मोरे म्हणाले, ‘संशयावरून पथकाने दागिने पकडले आहेत. प्राप्तीकर विभागाकडून अधिक चौकशी सुरू आहे. योग्य कागदपत्रे सादर केल्यास दागिने परत केले जातील, अन्यथा सर्व दागिने प्राप्तीकरच्या अधिकाऱ्यांकडे सोपवले जातील. तावडे हॉटेलवरून थेट कोल्हापुरात येण्याचा मार्ग असतानाही सरनोबतवाडीमार्गे व्हॅन का आली? याची समर्पक उत्तरे मिळाली नाहीत. याबाबत चौकशी सुरू आहे.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून पोलिसांसह एसएसटी पथकांकडून जिल्ह्यात ४८ ठिकाणी तपासणी नाके सुरू आहेत. ११ मार्चपासून तपासणी पथकांनी सुमारे दोन कोटींचा मुद्देमाल पकडला. यात सुमारे कोटींची रोकड आहे, तर सोने आणि मद्याचा सुमारे एक कोटींची साठा जप्त केला. याशिवाय २१ लाखांच्या बनावट नोटाही जप्त केल्या आहेत.

First Published on April 15, 2019 10:13 pm

Web Title: kolhapurs malabar jewellers 71 lakhs gold and diamond sized by police