News Flash

कोंडेकलच्या जंगलातील चकमकीचा म्होरक्या जोगन्नाच

यामागील मुख्य सूत्रधार जोगन्नाच होता, अशी माहिती आता समोर आली आहे.

मुक्काम सीमावर्ती भागातच, नवसदस्यांचा शस्त्र प्रशिक्षकही

कोंडेकलच्या जंगलात नक्षलवादी व पोलिस दलात झालेल्या चकमकीत नक्षलवाद्यांच्या विभागीय समितीचा सदस्य जोगन्नाचा सक्रीय सहभाग होता. दरम्यान, जोगन्नाचे वास्तव्य गडचिरोली व बस्तर सीमावर्ती भागातील जंगलात असून त्यानेच चातगाव, पेंढरी व प्लॅटून क्रमांक तीन दलमच्या माध्यमातून पोलिस दलाला घेरण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती आहे.
धानोरा तालुक्यातील गट्टा फुलबोडी पोलिस मदत केंद्रांतर्गत असलेल्या कोंडेकलच्या जंगलात ३ सप्टेंबरच्या सायंकाळी नक्षलवादी व पोलिसांमध्ये चकमक झाली. यामागील मुख्य सूत्रधार जोगन्नाच होता, अशी माहिती आता समोर आली आहे. गडचिरोलीचे जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनीच हा अंदाज व्यक्त केला आहे. २८ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान नक्षल सप्ताह, तसेच गेल्या वष्रेभरात नक्षलवाद्यांना मोठी कृती करता आलेली नसल्याने नक्षलवादी नेते चांगलेच संतापले आहेत. त्याचाच परिणाम म्हणून नक्षलवाद्यांनी मध्यंतरी आदिवासींचे हत्यासत्र आरंभले होते. कोणती तरी मोठा घातपात घडवून आणण्याच्या उद्देशानेच डीव्हीसी सदस्य जोगन्ना स्वत: या भागात मुक्काम करून तशा हालचाली करीत आहेत, अशीही माहिती समोर आली आहे. सध्या जोगन्नाचा मुक्काम गडचिरोली व बस्तरच्या सीमावर्ती भागातील जंगलात आहे. गडचिरोलीत नक्षलविरोधी अभियान सुरू झाले की, जोगन्ना छत्तीसगडच्या जंगलात निघून जातो. तिकडे छत्तीसगड पोलिसांनी कारवाया केली की, तो गडचिरोलीच्या जंगलात मुक्कामाला येतो, अशीही माहिती आहे. त्याच्या नेतृत्नाखालीच या चळवळीत सहभागी होणाऱ्या तरुण-तरुणींना शस्त्र व बॉम्ब हाताळण्याचे प्रशिक्षण जोगन्नाच देत असल्याची माहिती पोलिसांना सापडलेल्या कागदपत्रांमधून समोर आली आहे. विशेष म्हणजे, सूत्रांनीही तस दुजोरा दिला आहे. केवळ हेच नाही, तर गावक ऱ्यांशी संवाद कसा साधायचा, जनमिलिशिया दलमचे काम कसे चालते, चळवळीचे कार्य काय, कोणकोणत्या राज्यात ती सक्रीय आहे, याची अभ्यासपूर्ण लेखी माहिती देण्यासोबतच एरिया समिती, नक्षलवाद्यांचा राजकीय निधी, वरिष्ठ कॅडरमध्ये कोण काम करतात, याबद्दलची सविस्तर माहितीही चळवळीतील तरुणांना देण्यात येते. एक प्रकारे जोगन्ना हा गडचिरोली व बस्तर परिसरात मुक्काम ठोकून तरुणांना चळवळीत सहभागी करून घेण्यासाठी व त्यांच्याकडून हिंसक कारवायाही करवून घेतो. विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसात सिरोंचा, एटापल्ली, धानोरा, कोरची व परिसरातील जंगलात मोठय़ा प्रमाणात नक्षलवाद्यांची शिबिरेही झाल्याची माहिती आहे. त्यामुळे येत्या काळात नक्षलवादी एखादी मोठा घातपात करू शकण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, ३ सप्टेंबरच्या चकमकीनंतर जोगन्ना छत्तीसगडमध्ये पळून गेला असावा, असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. सध्या तरी पोलिसांनी त्याच्यावर लक्ष्य केंद्रित केले असून सीमावर्ती भागात नक्षल अभियान अधिक तीव्र करण्यात
आले आहे.
आत्मसमर्पित नक्षलवाद्याची हत्या
सशस्त्र नक्षलवाद्यांनी काल, शुक्रवारी मध्यरात्री एटापल्ली तालुक्यातील गट्टा-जांभियाच्या जंगलात महेश मट्टामी (रा. नैनवाडी) या आत्मसमर्पित नक्षलवाद्याची हत्या केली. महेश मट्टामी पूर्वी नक्षल दलममध्ये सक्रीय होता. काही महिन्यांपूर्वी त्याने पोलिस दलासमोर आत्मसमर्पण केले होते. काही कामानिमित्त तो गावाकडे गेलेला असता नक्षलवाद्यांनी त्याचा पाठलाग करून हत्या केली. आज सकाळी गट्टा-जांभियाच्या जंगलात महेशचा मृतदेह सापडला. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे. १५ दिवसांपूर्वीही नक्षलवाद्यांनी अशाच एका नक्षलवाद्याला बेदम मारहाण केली होती. तो दलममधील अन्य सहकाऱ्यांना आत्मसमर्पणासाठी प्रोत्साहित करीत होता. मात्र, ही बाब माहिती होताच नक्षलवाद्यांनी त्याला मारहाण केली. महेश मट्टामीची हत्याही नक्षलवाद्यांनी यातूनच केली असावी, असे बोलले जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2015 1:06 am

Web Title: kondekal forest leader jogannach
Next Stories
1 दुष्काळाच्या प्रश्नाचे राजकारण करू नका- पवार
2 लातूरला महिन्यातून एकदाच पाणी!
3 शेतीचे वीजबिल व कर्जवसुलीस स्थगिती
Just Now!
X