17 January 2021

News Flash

कोंढवी किल्लय़ावर शिवकालीन मूर्ती सापडल्या

या कोंढवी गडाकडे दर्शनासाठी रीघ लागली आहे

पोलादपूर तालुक्यातील ऐतिहासिक कोंढवी किल्लय़ावर भैरवनाथ जोगेश्वरी मंदिराच्या जीर्णोद्धार समयी खोदकाम करतेवेळी शिवकाळातील १५ मुर्त्यां सापडल्या आहेत.

तालुक्यातील आठगाव भैरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या कोंढवी येथे मंदिराचे काम करतेवेळी पाण्यासाठी पाण्याची टाकी बांधण्यासाठी खोदकाम करतेवेळी शिवकाळातील पंधरा मुर्त्यां सापडल्या या मूर्तीमध्ये भैरी ,जोगेश्व्री ,वाघजाई, वीर मूर्ती, तसेच गणेश मूर्ती इत्यादी मूर्तिंचा समावेश आहे. मोठय़ा प्रमाणात मुर्ति सापडल्यामुळे पोलादपूर तालुक्यासह कोकणातील भाविकांची या कोंढवी गडाकडे दर्शनासाठी रीघ लागली आहे

तालुक्यातील आठगाव भैरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या कोंढवी सह चोळई, गाजवणे, खडकवणे, धामणदेवी, फणसकोंड, गोलदरा, तळ्याचीवाडी या गावाचे आराध्य दैवत असलेल्या जोगेश्वरी मंदिराच्या पूर्व बाजू पाण्याची साठवण टाकी साठी खोदकाम करीत असताना या मुर्त्यां आढळून आले आहेत.

या मुर्त्यां मध्ययुगीन व शिवकाळातील असून सदर मुत्यांमध्ये श्री गणेश, भैरी जोगेश्वरी वाघजाई वीर मुर्त्यां इत्यादींचा समावेश आहे कोकण इतिहास परिषदेचे प्रा.अंजय धनावडे तसेच इतिहास संशोधक प्रवीण भोसले यांनी या मूर्त्यां संदर्भात या मुर्त्यां चौदाव्या शतकापासून अठराव्या शतकापर्यंत असल्याचे नमूद केले आहे सदर मुर्ती या अगोदर सुद्धा येथे शिव लिंगाखालील पीठ,दिवा,तसेच मध्ययुगीन भांडय़ांचे अवशेष सापडले आहेत.

इतिहासकाळात आदिलशाही मध्ये पोलाद जंग नावाचा सरदार येथे कारभार पाहत होता त्यानंतर चंद्रराव मोरे यांची सत्ता होती चंद्रराव मोरे यांचा पाडाव करून छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात आणला येथील भैरी जोगेश्वरी देवस्थान शिवकाळापासून प्रसिद्ध आहे.

‘कोंढवी हे आदिलशाही काळापासून एक प्रमुख परगणा अथवा महत्वाचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे . शिवकाळात या कोंढवी गडाचे फार महत्व आहे कोकण व घाट माथ्यावर जाणारम्य़ा प्रमुख मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्लय़ाचा वापर केला गेला श्री भैरवनाथ जोगेश्वरी हे मंदिर प्राचीन काळापासून कोंढवी येथे अस्तित्वात आहे येथे मुंबई, पुणे, बडोदे या ठिकाणावरून मोठय़ा प्रमाणात पर्यटक व शिवभक्त येथे भेटी देतात. मात्र येथे कोणत्याही प्रकारची सुविधा नसल्यामुळे भक्तांची गैरसोय होते तरी या स्थळास शासनाने कोकण पर्यटन स्थळ व तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात यावा व येथे यात्रा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात ही आमची प्रमुख मागणी आहे.’   – एकनाथ गायकवाड, अध्यक्ष, आठगाव भैरी देवस्थान

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 9, 2021 1:25 am

Web Title: kondhavi fort jogeshwari temple mppg 94
Next Stories
1 गोसेखुर्द प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
2 पालघर जिल्हा परिषदेचे शिक्षण, आरोग्य विभाग कमकुवत
3 वसईत आगी लागण्याच्या संख्येत १४४ ने घट
Just Now!
X