News Flash

दापोलीत आता स्वतंत्र उद्यानविद्या महाविद्यालयासाठी प्रयत्न

कोकण कृषी विद्यापीठाची माहिती

कोकण कृषी विद्यापीठाची माहिती

दापोलीत स्वतंत्र उद्यानविद्या महाविद्यालयाचा प्रस्ताव तयार करण्याची सूचना उद्यानविद्याप्रमुखांना करण्यात आल्याचे स्पष्ट करत असे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने सध्या या महाविद्यालयात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना दापोलीतच शिक्षण पूर्ण करण्याची संधी दिली जाणार असल्याचे आता स्पष्ट केले आहे.

दापोलीच्या उद्यानविद्या महाविद्यालय स्थलांतराच्या बातमीबाबत कोकण कृषी विद्यापीठाने माहिती देताना हे महाविद्यालय सिंधुदूर्गात हलवण्यात आल्याचे मान्य केले. या बातमीमुळे दोन दिवसांपासून विद्यार्थ्यांमध्ये खळबळ उडाली होती. हे वातावरण शांत करण्यासाठी सध्या पहिल्या ते तिसऱ्या वर्षांला शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना येथेच अभ्यासक्रम पूर्ण करण्याची संधी दिली जाणार आहे, असे स्पष्टीकरण विद्यापीठाने एका पत्रकाद्वारे दिले आहे. मात्र येथील पदवीला भारतीय कृषी अनुसंधान परिषदेकडून (आयसीएआर) मान्यता मिळणार का की पदवी मुळदे येथील महाविद्यालयाकडून दिली जाणार, याबाबत मात्र या पत्रकात काहीच नमूद करण्यात आलेले नाही. आयसीएआरच्या अटीमुळे विद्यापीठाने दापोलीतील या महाविद्यालयाची प्रतिवर्षी ३२ विद्यार्थीसंख्या मुळदे येथील ६०विद्यार्थीसंख्या असलेल्या महाविद्यालयाकडे वर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे.

विशेष म्हणजे आयसीएआरने दापोलीतील उद्यानविद्या महाविद्यालयातील शैक्षणिक दर्जाबाबत उपस्थित केलेला प्रश्न विद्यापीठाने अधिकृतपणे या पत्रकात जाहीर केला. शैक्षणिक सुविधांसाठी निधी उपलब्ध करून देणाऱ्या आयसीएआरच्या अशा सूचनांमुळेच महाविद्यालय स्थलांतराचा निर्णय घेतल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. आता कृषीविद्या शाखेमार्फत स्वतंत्र उद्यानविद्या महाविद्यालयाचा प्रस्ताव लवकरच राज्य शासनाकडे पाठवण्यात येणार आहे, असेही या पत्रकात विद्यापीठाचे शिक्षण संचालक व अधिष्ठाता डॉ. रमेश बुरटे यांनी म्हटले आहे. दरम्यान, या महाविद्यालयाच्या स्थलांतरामुळे जिलच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीबाबत कोणत्याही लोकप्रतिनिधीकडून गांभीर्याने दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे शिक्षणाच्या मुद्द्यावर स्थानिक लोकप्रतिनिधींच्या ‘ज्ञानदारिद्रया’चा प्रत्यय रत्नागिरी जिल्हावासियांना आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2017 12:49 am

Web Title: konkan agriculture university gardening college
Next Stories
1 ‘कॉपी कॅट’ मुख्यमंत्री हे महाराष्ट्राचे दुर्दैव- सुप्रिया सुळे
2 सॅमसंग, ओप्पो, विवो आणि जिओ विरोधात गुन्हा दाखल
3 कर्जमाफीसाठी वेळकाढूपणा -सुप्रिया सुळे
Just Now!
X